कुरुल : मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी ग्रामपंचायत निवडणुकीत लोकशक्ती परिवाराच्या परमेश्वर ग्रामविकास आघाडीने ७ पैकी ५ जागा मिळवून यश मिळवले. विरोधी गटाचे नेते तंटामुक्तीचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले.
प्रभाग एक मध्ये माजी सरपंच दीपक पुजारी व सुवर्णा पुजारी हे दांपत्य विजयी झाले आहेत.
माजी सरपंच दीपक पुजारी यांच्या नेतृत्वाखालील परमेश्वर ग्रामविकास आघाडीने निवडणूक लढवली. या निवडणुकीत दीपक पुजारी, सुवर्णा दीपक पुजारी, सुमित्रा तात्या दुधाळ, सुरेश शिवाजी पुजारी, सोमनाथ बजिरंग कांबळे तर विरोधातील दुधाळ गटाचे दोन उमेदवार शिफाली कृष्णा कांबळे, मीना मलका दुधाळ निवडून आले. परमेश्वर मंदिरातील दर्शनानंतर विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केदार लिगाडे, सिद्धलिंग दुधाळ, तायप्पा पुजारी, महावीर पुजारी, बिभीषण बंडगर, लक्ष्मण सलगर, सायाप्पा खरात, हणमंत माने, भिकाजी कांबळे उपस्थित होते.