शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

प्रेमळ पण तत्त्वनिष्ठ : डॉ. गो. मा. पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 4:12 PM

८७ वर्षांतही तरूण असणारे ‘गोमा’ सर आपल्यातून निघून गेले होते...स्वत:च्या वास्तव्यामुळे  मराठी साहित्यविश्वात सोलापूरची ओळख निर्माण करणाºया या थोर सरस्वतीपुत्राला ‘लोकमत’ची श्रध्दांजली!

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर पवार सरांनी सोलापुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला मुदितात प्रवेश केल्याबरोबर पवार सर आणि त्यांची पत्नी सुजाता उर्फ माई येणाºया पाहुण्यांचं हसतमुखाने स्वागत करीत असत.

दत्ता गायकवाड

साहित्यशारदेचा पुत्र डॉ. गो. मा. पवार निवर्तल्याची बातमी मंगळवारच्या सकाळी अवघ्या महाराष्टÑात पसरली अन् मराठी सारस्वत सुन्न झाले. सोलापूरच्या समाजजीवनात तर ‘गोमां’ना आदराचे स्थान होते. सोलापूरकरांना गलबलून आले. महाराष्टÑातील विविध महाविद्यालयांत वरिष्ठ प्राध्यापक, प्राचार्य म्हणून कार्यरत असणाºया सरांच्या विद्यार्थ्यांचे फोन ‘मुदिता’वर खणखणू लागले. काय झाले होते सरांना?...अचानक असे कसे?..या प्रश्नांना ‘गोमां’च्या सुनबाई  प्रिया पवार उत्तरे देत होत्या. सतत उत्साही असणारे मिश्किल स्वभावाचे ‘गोमा’ सर असं अचानक जातील, हे कुणालाही खरं वाटेना..एव्हाना सरांच्या निवासस्थानासमोर साहित्य रसिकांची आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी झाली...होय..हे वास्तव होतं. सरांनी देह ठेवला होता. ८७ वर्षांतही तरूण असणारे ‘गोमा’ सर आपल्यातून निघून गेले होते...स्वत:च्या वास्तव्यामुळे  मराठी साहित्यविश्वात सोलापूरची ओळख निर्माण करणाºया या थोर सरस्वतीपुत्राला ‘लोकमत’ची श्रध्दांजली!

शिवाजी विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर पवार सरांनी सोलापुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ‘बौद्ध धर्मातील ब्रह्मविहारातील चार अवस्था ज्या सांगितलेल्या आहेत, त्यातील एक अवस्था म्हणजे ‘मुदिता’ ही होय. मुदिताचा अर्थ आहे आनंदी राहणे. जगाकडे आनंदीवृत्तीने पाहणे आणि त्यांच्या निवासस्थानाला ‘मुदिता’ हे नाव सरांनी दिलेले आहे. मुदितात प्रवेश केल्याबरोबर पवार सर आणि त्यांची पत्नी सुजाता उर्फ माई येणाºया पाहुण्यांचं हसतमुखाने स्वागत करीत असत.

सरांच्या घरच्या पाहुणचाराने महाराष्टÑातील नामवंत साहित्यिक तृप्त होऊन जात असे. किंबहुना त्याचं नातं अधिक दृढ होत असे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे डॉ. भालचंद्र नेमाडे सरांचे खास मित्र. ते इंग्लंडहून भारतात परत आले, तेव्हा त्यांच्या नोकरीचा प्रश्न जटिल झालेला होता. पवार सरांनी नेमाडे सरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून सामावून घेण्यास भाग पाडले.

पवार सरांचं मौलिक कार्य म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील चरित्रात्मक बृहद्ग्रंथ, या ग्रंस्थास साहित्य अकादमीपासून महाराष्टÑातील विविध संस्थांच्या वातीने मिळालेला पुरस्कार. सोलापूरच्या भैरुरतन दमाणी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केलेलं आहे.

पवार सरांनी अनेकांना मदत केलेली आहे. माझ्या मित्राची पत्नी साताºयातील एका खेड्यात रयत शिक्षण संस्थेत माध्यमिक शिक्षिका म्हणून काम करीत होती. तिला लहान मूल होतं. गैरसोय होती. तिची बदली करण्यासाठी सरांना विनंती केली. तिची अडचण लक्षात घेऊन सरांनी संबंधित पदाधिकारी संजीव पाटील यांना त्या शिक्षिकेची अडचण सांगितली. पाटील सरांनी ताबडतोब तिची सोलापूरला बदली केली. असाच प्रसंग एका पत्रकारावर आलेला होता. त्याला कामावरून कमी केले होते. त्याची अडचण मी सरांच्या कानावर घातली. संपादकाला सरांनी फोन करून त्याला दुसरी नोकरी मिळवून दिली, अशी असंख्य कामे सरांनी केलेली आहेत.अनाथ मुलांचे आपलं घरला दरवर्षी सरांकडून एका मुुलाचा खर्च दिला जात असे. कार्यक्रमात भेट म्हणून दिलेल्या शाली त्यांनी आपलं घरच्या अनाथ मुलांना थंडीत वापरण्यासाठी देत असे.

सरांचं वैशिष्ट्य असे की, ते जेवढे प्रेमळ तेवढेच तत्त्वनिष्ठ होते. एखादी गोष्ट त्यांना पटली नाही तर त्यावर ते प्रतिवाद करीत असत. त्यांच्या पीएच. डी.च्या प्रबंधास पु. ल. देशपांडे परीक्षक म्हणून उपस्थित होते. पवार सरांनी त्यांच्या ग्रंथात पु. ल. देशपांडेंच्या विनोदावर टिपणी केलेली होती. ‘सर म्हणायचे, मी पु. लं.च्यावर आक्षेपार्ह लिहिलेले असताना पु. लं. नी माझ्या ग्रंथावर अनुकूल मत दिले. पवार सर पु. लं.च्या विषयी आत्यंतिक आदराने उल्लेख करीत.

साहित्य क्षेत्रात त्यांनी व्यंकटेश माडगुळकरांच्या कथेवर खूप मर्मग्राही विवेचन केलेलं आहे. ‘ओझ’ ह्या व्यंकटेश माडगुळकरांच्या कथाचं संपादन केलेलं आहे. उपेक्षितांचं जीवन रेखाटणारा हा लेखक त्यांच्या आवडीचा होता.

एकदा सरांच्यावर मानहानीचा प्रसंग आला. सोलापूर मेडिकल कॉलेजच्या डीनकडे सर एक काम घेऊन गेले होते, तो डीन एवढा उद्धटपणे सरांशी बोलला, सर त्यामुळे खूप अस्वस्थ झाले. मला सरांनी फोन केला आणि झालेला वृत्तांत त्यांनी मला सांगितला. डीनच्या जवळच्या माणसाला झालेला प्रकार सांगितला आणि त्याची चोवीस तासात बदली होईल, असे सुनावले. डीनच्या माणसाने झाला प्रकार डीनला सांगितले आणि तुम्ही कुणाशी एवढे मस्तवाल वागलात माहीत आहे तुम्हाला? डीनला आपली चूक लक्षात आली आणि सरांना फोन करून गयावया करू लागला. त्यांच्या असिस्टंटला पुष्पगुच्छासह पाठवून क्षमेची याचना केली. सरांनीही ती उदारपणे क्षमा दिली आणि यापुढे सर्वसामान्यांशीही सन्मानाने वागा, असा सल्ला दिला.

सरांच्या असंख्य आठवणी मनात साठवून त्यांचे स्मरण करावयाचे एवढेच आपल्या हाती आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर