शीतलकुमार कांबळे, सोलापूर: जिल्ह्यात लम्पीने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत आहे. बुधवार २१ जून रोजी लम्पीमुळे चार जनावरे दगावली आहे. त्याच दिवशी १८ जनावरे बाधित झाली आहेत. लम्पी स्कीन आजार आटोक्यात आला असे वाटत असतानाच या आजाराने आता पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशाबरोबरच महाराष्ट्रातही लम्पी स्कीनच्या आजार पुन्हा डोक वर काढले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
अनेक जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षी संपूर्ण राज्यभरात जनावरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. मोठ्या प्रमाणावर जनावरे देखील दगावली होती. लम्पी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. आता पुन्हा लम्पी आजाराने बाधित जनावरांची संख्या वाढत आहे.
लम्पी आजाराजी स्थिती
- मृत पशूधन : ३९४०
- अत्यवस्थ असलेले जनावर : ३४
- बाधित गावे : ८९४
- एकूण बाधित पशुधन : ४२०६९