शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

मंगळवेढयात लंपीचे थैमान सुरुच; ३८५ गायींना आजाराची लागण

By काशिनाथ वाघमारे | Published: May 30, 2023 3:59 PM

या सर्व गायींवर उपचार सुरु असून गेल्या वर्षभरात १९०८ जनावरे उपचारांती बरी झाली आहेत.

सोलापूर : लंपी आजाराने मंगळवेढा तालुक्यात थैमान घातल्याने जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे तर दुसरीकडे पशूपालकातील चिंता वाढत चालली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मोठया संख्येने जनावरे या आजाराला बळी पडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान आत्तापर्यंत २७४ गायींना लंपीची लागण झाली असून गेल्या वर्षभरात २७० गायी या आजाराला बळी पडलेल्या आहेत.

मंगळवेढा तालुक्यात गावनिहाय लंपी आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांची संख्या पुढीलप्रमाणे :अकोला १७, आबसेवाडी १, शेलेवाडी २, भोसे ३, माळेवाडी २, जालिहाळ १, हाजापूर ३,हिवरगांव ४, जंगलगी -१, जित्ती १, चिकलगी २, कचरेवाडी ४२, डोंगरगांव ३, हुलजंती १, खोमनाळ ६,फटेवाडी २, तळसंगी ३१, भालेवाडी ०२, मरवडे -२,मंगळवेढा-२२, हुन्नूर १,देगांव-१,घरनिकी १०, आंधळगाव २, मारापूर १४, बावची १, गुंजेगाव ३, लक्ष्मी दहिवडी -२, नंदेश्वर ४, रेवेवाडी १, सोड्डी २, शिवणगी१, शेलेवाडी ४, सलगर बु.२, सलगर खु १, शिरनांदगी- १०, मारोळी १,रड्डे -१, ब्रम्हपुरी१, धर्मगांव १, बठाण १४, मुढवी ६, उचेठाण ६, रहाटेवाडी ३, मुंढेवाडी १, सिध्दापूर ९, तांडोर २, डोणज १५, बोराळे ०२, नंदूर ५ असे एकूण २७४ जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे.

१९०८ जणावरे झाली बरीया सर्व गायींवर उपचार सुरु असून गेल्या वर्षभरात १९०८ जनावरे उपचारांती बरी झाली आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एम.एल.नरळे,व भास्कर पराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढयातील पशुसंवर्धन विभाग या लंपी आजारावर उपचार करीत आहे. दरम्यान लंपी आजार दिवसेंदिवस वाढत असताना येथे मात्र पशुवैदयकिय अधिकार्यांची संख्या कमी असल्याने तारेवरची कसरत करत कामकाज करावे लागत आहे. तात्काळ रिक्त जागा भरून लंपी आजारावर नियंत्रण ठेवावे अशी मागणी होत आहे.