सोलापूर : विवाहित महिलेला फूस लावून पळवून नेले, पुण्यात तिच्यावर मित्रालाही अत्याचार करायला लावल्याप्रकरणी, दोघांविरुद्ध बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश नरळे, विष्णू बरगंडे (दोघे रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गणेश नरळे हा नात्यातील महिलेला सतत बोलत होता. एप्रिल २०१८ मध्ये तो अचानक घराजवळ आला. बोलत बोलत त्याने विवाहित महिलेला माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणाला. महिलेने माझे लग्न झाले आहे, चार मुले आहेत, तुला माहीत नाही का? असे म्हणून हाकलून दिले होते. मात्र गणेश याने मला दोन दिवसात सांग अन्यथा तुझे व माझे अनैतिक संबंध आहेत, अशी बदनामी करण्याची धमकी दिली. दोन दिवसानंतर तो पुन्हा घरी आला व त्याने मला तुझ्याकडून नकार नकोय, आज रात्री मी तुला घरी भेटायला येतो असे म्हणून निघून गेला. महिलेने त्याला तिच्या दुसऱ्या घरी येण्यास सांगितले. गणेश नरळे हा तिच्या दुसऱ्या घरी गेला व तेथे तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर सातत्याने असा प्रकार घडू लागला.
विवाहितेने त्याचा संपर्क कमी केला तेव्हा त्याने तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली. शेवटी महिलेला फूस लावून २८ ऑक्टोबर २०२० ला मोटारसायकलवर बसवून पुणे येथे पळवून नेले. तेथे ४५ दिवस झाल्यानंतर गणेश नरळे याला त्याच्या मित्राचा फोन आला. मित्र म्हणाला की, महिलेचा भाऊ विनंती करीत आहे, तिला चार मुले आहेत. आम्ही काही म्हणणार नाही, बहिणीला आणून सोड. तेव्हा गणेश नरळे याने महिलेला सोलापूरला सोडले होते.
दुसऱ्यांदा दिली आत्महत्या करण्याची धमकी
० जानेवारी २०२१ मध्ये पुन्हा गणेश फोनवर तो बोलताना म्हणाला की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू निघून ये अन्यथा मी आत्महत्या करेन. मुलांना मारून टाकेन, बदनामी करेन अशी धमकी दिली. पुन्हा ८ जानेवारी २०२१ रोजी महिला पुण्यात गणेश याच्याकडे गेली. तेथे त्याने तिला भाड्याने खोली घेऊन ठेवले होता. एके दिवशी त्याचा मित्र विष्णू हादेखील घरी आला. गणेश नरळे हा घरातून बाहेर गेला अन् बाहेरून कडी लावला. आतील मित्राने धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर दोघांनीही हा प्रकार कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती. महिला सोलापुरात पळून आली त्यानंतर तिने पुन्हा जाऊन दोघांविरुद्ध फिर्याद दिली.