विठ्ठल खेळगीसोलापूर : मोहिते-पाटील आणि रामराजेंचा विरोध असतानाही भाजपने माढ्याची उमेदवारी पुन्हा एकदा रणजीतसिंह निंबाळकरांना दिली. मात्र, मोहिते-पाटलांना पक्षात घेऊन शरद पवार यांनी मोठा डाव टाकला. त्यांची ही खेळी यशस्वी ठरणार की महायुतीतील पाच आमदारांच्या जोरावर निंबाळकर पुन्हा बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.
सन २००४ पर्यंत पंढरपूर लोकसभा मतदारसंघ असलेला आता माढा मतदारसंघ बनला. २००९ मध्ये शरद पवारांनी माढ्याचे नेतृत्व केले. २०१४ मध्येही विजयसिंह मोहिते-पाटलांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच ठेवला. त्यानंतर २०१९ मध्ये मोहिते-पाटलांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपने काँग्रेसमधून आलेल्या रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रथम कमळ फुलले. यंदा मात्र मोहिते-पाटील भाजपच्या विरोधात आहेत. निंबाळकरांची भिस्त संजयमामा शिंदे व बबनराव शिंदे यांच्यावरच आहे.
मोहिते-पाटील अन् जानकर फॅक्टरपवारांची उमेदवारी मोहिते-पाटलांना दिल्यानंतर महायुतीचे नेते उत्तम जानकरांच्या पाठीमागे लागले. विमानातून प्रवास घडविला. अनेक ऑफर दिल्या. मात्र, जानकरांनी कार्यकर्त्यांमध्ये येऊन मोहिते-पाटलांना साथ देण्याची भूमिका जाहीर केली. मागील ३० वर्षांतील राजकीय संषर्घ संपुष्टात आला.
पाच आमदारही महायुतीकडेआ. संजयमामा शिंदे (करमाळा), आ. बबनराव शिंदे (माढा), आ. शहाजीबापू पाटील (सांगोला), राम सातपुते (माळशिरस), जयकुमार गोरे (माण-खटाव) हे पाचही आमदार महायुतीकडे आहेत. या आमदारांच्या जोरावरच निंबाळकर मैदानात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर यांना मिळणाऱ्या मतांचा फटका कोणाला बसणार, यावर निकाल अवलंबून आहे. आता मोदींच्या गॅरंटीवर निंबाळकर मैदानात लढत आहेत. मोहिते-पाटलांनी पुन्हा जुन्या नेत्यांची मोट बांधली आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
निरा-देवघर सिंचन योजनेतील पाण्याचा विषय दोन्हींकडून मांडला जात आहे.फलटण ते पंढरपूर रेल्वेचा प्रश्न आणि एमआयडीसीच्या मुद्द्यावर दोघेही बोलत आहेत.केळी क्लस्टर, डाळिंब, द्राक्ष निर्यात, बेदाणा प्रक्रिया संशोधन केंद्र सुरू करण्याचे प्रश्नही आता पुढे आले आहेत.
२०१९ मध्ये काय घडले?रणजीतसिंह निंबाळकर भाजप (विजयी) ५,८६,३१४ संजयमामा शिंदे राष्ट्रवादी ५,००,५५०ॲड. विजयराव मोरे वंचित बहुजन आघाडी ५१,५३२ नोटा - ३,६६६