Madha Lok Sabha Election ( Marathi News ) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीचा जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीने माढा लोकसभेचीतील उमेदवार जाहीर केल्यानंतर जोरदार हालचाली सुरू झाल्या. भाजपातील मोहिते पाटील गटाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून निवडणूक लढत आहेत. महायुतीने काल जोरदार प्रचारसभा घेतली. यावेळी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोतही उपस्थित होते. यावेळी खोत यांनी गावरानी भाषेत खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली.
'नियम तोडला नाही, विचार करुन कारवाई करावी'; विशाल पाटलांचा काँग्रेसला इशारा
माढा लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रचारसभा सुरू केल्या आहेत. यावेळी सदाभाऊ खोत यांनी जोरदार टोला लगावला. "ही लढाई वाडा विरुद्ध गावगाडा आहे, ही लढाई प्रस्थापीत विरुद्ध विस्थापितांची आहे. म्हणून या मतदारसंघात पवार साहेब कोणालाही देऊन देतील. आता काय काय म्हणतात साहेबांचे वय ८४ आणि आता सभा ८४ घेणार आहेत. आता साहेबांना काय काम आहे, पाणी पाजायचे आहे की, म्हैशी पाळायच्या आहे. त्यांचा हाच धंदा आहे, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना लगावला.
"पण, साहेबांना मानावं लागेल. या वयातही आमच्या सारख्यांना चान्स देत नाहीत. बाप पोरग कर्तबगार झालं की कुटुंबाची जबाबदारी पोराच्या हातात देतात. पण हे म्हातारं खडूस आहेत, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरत आहेत. अजितदादा किल्लीकडे बघून बघून म्हातारे झाले. अजितदादांच्या लक्षात आलं, हे किल्ली काढत नाहीत म्हणून आता दादा किल्लीला लोमकाळत किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली.
"दादा आता मोठ्या विकासासाठी भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.