सोलापूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदीलाटेनं माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पार वाट लावली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत याचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात भाजपचे रणजिसिंह नाईक-निंबाळकर यांच्यापुढे राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे याच्या रूपानं राष्ट्रवादीनं भाजपासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. यंदा भाजपचे रणजितसिंह नाईक -निंबाळकर, राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे अॅड़ विजयराव मोरे यांनी धडाकेबाज प्रचार करून जोरदार हवा केली आहे़ त्यामुळे इथल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना १ लाख ४२ हजार ६४१ मतं मिळाली असून राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांच्या पारड्यात १ लाख ३७ हजार ८२६ मतं पडली आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात एकूण १२ लाख ११ हजार मतांची मतमोजणी होणार आहे़ कुणाला किती मतं मिळणार याकडे साºयाचे लक्ष लागले आहे.
गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पराभव केला होता़