माढा : तहसील कार्यालयाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत माढा तहसील कार्यालय इतरत्र स्थलांतरित करू नये. तालुक्याची सर्व कार्यालये येथेच सुरू ठेवावीत, अशा मागणीचे निवेदन शिवसेना शहरप्रमुख संभाजी साठे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिले.
माढा तहसील कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडण्यात येणार आहे. या तहसीलमध्ये असणारी विविध कार्यालये ही स्थलांतरित होणार आहेत. ही कार्यालये माढ्यातच स्थलांतरित व्हावी, ती इतरत्र हलवू नये, याकरिता माढा शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनदरबारी निवेदन दिले आहे.
माढा तहसील कार्यालयाची इमारत फार जुनी आहे. ती जमीनदोस्त करून या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत होण्याकरिता आमदार बबनराव शिंदे यांच्या पाठपुराव्यातून मंजुरी मिळाली आहे. ही इमारत तयार होईपर्यंत या कार्यालयातील सर्व विभाग माढामध्येच ठेवण्यात यावेत. अन्यथा, आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे.
या मागणीबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, माढा उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, माढा पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.
या शिष्टमंडळात पोपट भांगे, नागनाथ कदम, अक्रम कुरेशी, राहुल मस्के, रहेमान पठाण, सुहास पोतदार, सुदर्शन मोहिते, सुरेश पाटेकर, गौतम शिंदे, विनोद कदम, विजय लोंढे, अमर भांगे, दत्तात्रेय अत्रे ,सैफान कोरबू, फारूक शेख, अशोक ठोंबरे, सुनील ठोंबरे, प्रमोद ठोंबरे, दीपक कांबळे, ओंकार पराडकर, वंदना मार्डीकर, अमृता भांगे, प्रमोद भोळ, तानाजी पाटील, आधार बागवान, अमर गायकवाड उपस्थित होते.
----
२७ माढा
माढा तहसील कार्यालय अन्यत्र हलवू नये, या मागणीचे निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना देताना शहरप्रमुख संभाजी साठे.