टेंभुर्णी, निमगाव टें, पिंपळनेर, चांदज, आढेगाव, राजणी, मोडनिंब, तुळशी, भोसरे, उंदरगाव, अकोले(खु.), कुर्डूवाडी, धानोरे, कन्हेरगाव ही गावे या दुसऱ्या टप्प्यात हाॅटस्पाॅट ठरली होती. शासनाच्या निकषाची अंमलबजावणी काटेकोरपणे न केल्याने बाधित रुग्णांचा शहरात व शेजारच्या गावात मुक्त वावर सुरू झाला. याच बाधित रुग्णांनी सुपर स्प्रेडरचे काम केले आहे.
तालुका प्रशासन व आ. बबनराव शिंदे, आ. संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यात १२ ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारली आहेत. विविध खासगी रुग्णालयांना कोविड हाॅस्पिटलची मान्यता देण्यात आली. त्यामुळे रुग्णांवर योग्यवेळी उपचार करणे शक्य झाले; परंतु तालुक्यात एकही सुपर मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल नसावे, ही मात्र दुर्दैवाची बाब आहे. यामुळे ऐनवेळी गंभीर, अत्यवस्थ रुग्णांची मोठी धावाधाव तर होतच आहे; पण योग्यवेळी योग्य उपचाराअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
---