विठ्ठल खेळगी
लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील चार-पाच जागा वगळता इतर जागांचा प्रश्न सुटलेला आहे. महाविकास आघाडीत सध्या सांगोला आणि दक्षिण सोलापूर या जागेवरून तिढा कायम आहे, तर महायुतीतून करमाळा आणि शहर मध्य मतदारसंघामध्ये जागेवरून स्पर्धा सुरूच आहे. विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
भाजपची पहिली यादी आली आहे. महाविकास आघाडीचीही लवकरच येईल. सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. महाविकास आघाडीत सांगोल्याची जागा शेकापला सुटणार हे ठरले होते. मात्र, ऐनवेळी उद्धवसेनेने दीपक साळुंखे- पाटील यांना पश्चात घेरून त्यांच्या हातात मशाल दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत बंडोखोरी होणार हे स्पष्ट झाले आहे.
माळशिरसमध्ये दोन्हीकडे सस्पेन्स
• माळशिरस विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीतून भाजपला आणि महाविकास आघाडीतून शरद पवार गटाकडे जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शरद पवार गटाकडून उत्तम जानकरांची उमेदवारी जाहीर झाली होती.
● मात्र, आता शरद पवार गटाच्या तालुकाध्यांसह इतर काही ने उमेदवारीसाठी आग्रही आहेत. महायुतीतून सातपुते यांच्याऐवजी आप्पासाहेब देशमुख आणि किशोर सुळ यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे दोन्हीकडे सस्पेन्स कायम आहे.
बार्शीत मशाल की तुतारी..
मविआमधून बार्शीची जागा मशालला सुटणार असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. सोपलांचे कार्यकर्ते पोस्टही फिरवत आहेत. शिवाय तुतारीकडून विश्वास बारबोले तयारीत आहेत. त्यामुळे बार्शीत तिढा राहणार आहे. त्यात मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेनंतर बार्शीचे राजकारण फिरणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वादात सेनेला प्रतीक्षा
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये इच्छुकांची भली मोठी रांग आहे. धर्मराज काडादी यांनी शरद पवारांकडे उमेदवारी मागून काँग्रेसचे टेन्शन वाढविले. त्यात निवडणुकीपूर्वी खा. संजय राऊतांनी सभा घेऊन दक्षिणच्या जागेवर दावाच ठोकला होता. जिल्हा प्रमुख अमर पाटील हेही माघारी फिरतील, असे वाटत नाही. त्यामुळे पवार दक्षिणची जागा काडादींना देणार की काँग्रेसला मिळणार, अशी गोची झाली आहे. दोघांच्या भांडणात उद्धवसेनेला जागा मिळणार की काय, अशी परिस्थिती सध्या तरी आहे.
जागा निश्चित उमेदवार ठरेना
माढा आणि मोहोळ या जागा शरद पवार गटाकडे जाणार आहेत. माढ्यातून रणजितसिंह शिंदे व रणजितसिंह मोहिते पाटील अशी चर्चा आहे. शिवाय अभिजित पाटलांक उमेदवारी जाईल अ सांगतात. मोहोळमध् मात्र पवारांकडे इडनभर इच्छुक आहेत.