शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

बार्शी शहर कोणाला लीड देणार, यावर ठरणार तालुक्याचा आमदार; प्रमुख नेत्यांच्या गावातील मतांकडे लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 11:36 IST

बार्शी विधानसभा मतदारसंघात लोकसभेला २ लाख ९ हजार ७५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

शहाजी फुरडे-पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क |

Barshi Vidhan Sabha ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीसाठी बार्शी मतदारसंघात शांततेत परंतु चुरशीने मतदान झाले. आता उद्या मतमोजणी होऊन निकाल समजणार असला तरी गावोगावी मात्र कोणाला लीड मिळणार? राजेंद्र राऊत की दिलीप सोपल निवडून येणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते आकडेमोड करण्यात गुंग झाले आहेत. २०१९ ला राजेंद्र राऊत हे ३ हजार मतांनी विजयी झाले होते. बार्शी विधानसभा मतदारसंघात लोकसभेला २ लाख ९ हजार ७५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर या निवडणुकीत २ लाख ४६ हजार ७१२ एवढे मतदान झाले आहे. म्हणजेच लोकसभेपेक्षा ३६९५८ मतदान जास्त झाले आहे. बार्शी तालुका हा तसा तीन भागात विभागला जातो. यामध्ये वैरागभागव ५७ गावे. उत्तर बार्शीतील ८२ गावे आणि बार्शी शहराचा समावेश आहे. सर्वजाती-धर्मांचे मोठ्या प्रमाणात मतदान असलेले बार्शी शहर हे मतदारसंघातील सर्वांत मोठे शहर आहे. शहरातील सुमारे १ लाख ५ हजार मतदारांपैकी ७६ हजार ३८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. लीडच्या गणितात बार्शीच रोलही निर्णायक राहणार आहे.

मोठ्या नेत्यांच्या गावातील झालेले मतदान 

ग्रामीण भागातील खालील गावे तालुक्यातील मोठी तर आहेतच परंतु या गावात दोन्ही पक्षांचे प्रमुख नेतेही आहेत. गावातील लीडवर त्या कथित पुढाऱ्यांचे वजनही दिसून येणार आहे. मागील निवडणुकीत मोठ्या गावाने आमदार राऊत यांना चांगला लीड दिला होता. तर वैराग भाग आणि उत्तर बार्शीतील ग्रामीण भागाने लीड दिला होता तर शहर मायनस होते. 

पानगाव - ४४१८, पांगरी ४२४०, उपळाई-३८१९, कारी-३३८७, उपळे दु-३३९८, आगळगाव-२६४३, खांडवी-२६२९, शेळगाव आर-२५८३, मालवंडी-२६८८, कोरफळे २५८९, गौडगाव-२४०१, सुर्डी-२३९५, नारी- २३६८, भातम्बरे-२३९८, श्रीपतपिंपरी-२३५१, सासुरे-२२७४, मळेगाव १८६५, बावी-२३३४ याप्रमाणे मतदान झाले आहे.

वैराग अन् ५७ गावांवर सर्वांच्या नजरा 

वैराग शहरात यंदा १६६८१ पैकी ११६८१ जणांनी मतदान केले आहे. मागील विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले निरंजन भूमकर हे सोपल यांच्याकडे असल्याने इथे कोण आघाडी घेणार हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बार्शीचा निकाल हा शहर आणि वैराग भागाने कोणाला साथ दिली आहे यावरून निश्चित होणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४barshi-acबार्शीSolapurसोलापूरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024