आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, काॅंग्रेसचे साेलापुरात शक्तीप्रदर्शन
By राकेश कदम | Updated: April 18, 2024 14:28 IST2024-04-18T14:27:34+5:302024-04-18T14:28:57+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी जाेरदार शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माजी आमदार, पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, काॅंग्रेसचे साेलापुरात शक्तीप्रदर्शन
- राकेश कदम
साेलापूर - काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी जाेरदार शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माजी आमदार, पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
काॅंग्रेस भवनापासून दुपारी १२ वाजता रॅलीला सुरुवात झाली. जिल्हा न्यायालय, सिव्हील चाैक, लष्कर मार्गे ही रॅली सात रस्ता चाैकात आली. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा केलेले लाेक लक्ष वेधून घेत हाेते. श्रीराम, सीता, लक्ष्णम आणि हनुमानाची वेशभूषा करूनही काही कलावंत सहभागी झाले हाेते. काॅंग्रेस भवनाजवळ जाहीर सभा झाली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाले, ही निवडणूक इतर निवडणुकांसारखी नाही. ही निवडणूक लाेकशाही वाचविण्यासाठी आहे. भाजपचे मागचे दाेन्ही खासदार निष्क्रिय ठरले. आज निवडणुकीत एकही खासदार प्रचारात दिसत नाही. लाेक त्यांना प्रश्न विचारतील म्हणून ते घाबरून येत नाहीत. आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.
देशात सरकारविरुध्द लाट : पटाेले
देशात आता माेदी सरकारच्या विराेधात लाट आहे. भाजपचे नेते घाबरले आहेत. ते विराेधकांना बदनाम करण्याचा कट करीत आहेत, असा आराेप प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केला.