शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

Maharashtra Lok Sabha election results 2024: पिपाणीने केला तुतारीचा घात; दहा मतदारसंघांत घेतली ४ लाखांहून अधिक मते, तरीही शरद पवार गट ठरला सरस

By राकेश कदम | Published: June 06, 2024 8:09 AM

Maharashtra Lok Sabha election results 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयाेगाने अजित पवार गटाला ‘घड्याळ’, तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे नवीन चिन्ह दिले.

साेलापूर : लाेकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दहा जागा लढविल्या. या दहा मतदारसंघांत पवार गटाच्या ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हासाेबत निवडणूक आयाेगाच्या ‘तुतारी’ अर्थात ‘ट्रम्पेट’ या चिन्हावर लढलेल्या अपक्ष उमेदवारांना मिळालेली चार लाख ३२ हजार २११ मते चकित करणारी आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयाेगाने अजित पवार गटाला ‘घड्याळ’, तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे नवीन चिन्ह दिले. पवार गटाने गावपाड्यावर ‘तुतारी’ वाजवून या चिन्हाचा प्रसार केला; परंतु प्रत्यक्षात निवडणुकीत सर्वच मतदारसंघात ‘तुतारी’ या शब्दाने पवार गटाची अडचण केल्याचे दिसून आले. ‘ट्रम्पेट’ हे ब्रिटिश वाद्य आहे. आपल्याकडचे वाजंत्री त्याला पिपाणी म्हणतात. निवडणूक आयाेगाने या चिन्हाला ‘तुतारी’ असे नाव दिले हाेते.

निवडणूक बॅलेट पेपरवर अपक्ष उमेदवारांच्या चिन्हासमाेर ‘तुतारी’ असाच उल्लेख केला. मतदानाच्या वेळी काेणत्या ‘तुतारी’समाेरचे बटन दाबायचे यावरून गाेंधळ उडाल्याचे पवार गटाचे म्हणणे आहे. सातारा वगळता इतर आठ मतदारसंघांत या पिपाणीवर मात करून पवार गटाचे उमेदवार विजयी झाले. अनेक ठिकाणी या चिन्हांवरून मतदारांमध्ये गोंधळ उडाल्याचे दिसले. 

तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर,  या सहा ठिकाणी काय घडले?बारामती मतदारसंघात साेयलशहा शेख १४ हजार ९१७ मते घेऊन चाैथ्या क्रमांकावर.शिरूरमध्ये अपक्ष उमेदवार मनाेहर वाडेकर यांनी २८ हजार ३३० मते घेतली. ते मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले.  अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार माेहन आळेकर ४४ हजार ५९७ मते घेऊन तिसऱ्या क्रमाकांवर. रावेरमध्ये एकनाथ साळुंखे ४३ हजार ९८२ मते घेऊन चाैथ्या क्रमाकांवर. भिवंडीत न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या कांचन वखारे यांनी २४ हजार ६२५ मते घेतली. त्या चाैथ्या क्रमाकांवर राहिल्या.  वर्ध्यात माेहन रायकवर २० हजार ७९५ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

साताऱ्यात मतविभाजन, माढ्यात तिसऱ्या क्रमाकांवरमाढ्यातील न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या रामचंद्र घुटुकडे यांना ‘तुतारी’ चिन्ह दिले. पवार गटाचे विजयी उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा १ लाख २० हजार ८३७ मतांनी पराभव केला. ‘तुतारी’ चिन्ह घेऊन लढणारे घुटुकडे ५८ हजार ४२१ मते घेऊन तिसऱ्या क्रमाकांवर राहिले. घुटुकडे यांची मते आपलीच असल्याचा माेहिते-पाटलांचा दावा आहे. साताऱ्यात भाजपच्या उदयनराजे भाेसले यांनी पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा ३२ हजार ७७१ मतांनी पराभव केला. ‘तुतारी’ चिन्हावरचे अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना ३७ हजार ६२ मते मिळाली. गाडे यांच्यामुळे मतविभाजन झाल्याचे पवार गटाचे म्हणणे आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल