पंढरपूर : महाशिवरात्रीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमा सह शेवंती व आणि बेल पात्राची मनमोहक सजावट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आली आहे. यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज विठूरायासह बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध सण आणि उत्सवाच्या काळात रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी च्या गाभाऱ्यात सुमारे एक टन शेवंती फूल तसेच बेल पात्रांचा वापर करून मनमोहक आरस करण्यात आली. या सजावटीत बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे विठुराया आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अधिकच सुंदर दिसत आहे. या सजावटीचे काम साई डेकोरेटर्स व शिंदे डेकोरेटर्स व मंदिर समिती या कर्मचाऱ्यांनी केले आहे.