शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

महात्मा गांधीजींचा अद्भुत प्रभाव ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:26 AM

माणूस जन्माला येतो आणि कालांतराने जगाचा निरोप घेतो. पण काही जण आपल्या जीवनात असे कार्य करतात की, आयुष्य संपल्यानंतरही ...

ठळक मुद्देभारतीय जन अमर रहे! गांधीजी अमर रहे!! भारत देश अमर रहे जय हिंद !!!जोपर्यंत भारताचं अस्तित्व आहे तोपर्यंत गांधी मरणार नाही, तो सदा पिढ्यान्पिढी जिवंत राहणार

माणूस जन्माला येतो आणि कालांतराने जगाचा निरोप घेतो. पण काही जण आपल्या जीवनात असे कार्य करतात की, आयुष्य संपल्यानंतरही त्यांचा प्रभाव त्या देशाच्या सर्वसामान्यांवर कायमचा कोरला जातो. त्यांचा प्रभाव कोठे आणि कोणत्या परिस्थितीत कसा जाणवेल ते कोणीही सांगू शकत नाही. असाच अनुभव मी प्रत्यक्ष माझ्या जीवनात अनुभवला असून, मी तो क्षण माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही.

गोष्ट १९८८-८९ ची असेल. त्या काळी सोलापूर येथील कल्पना टॉकीजमध्ये सदर प्रसंग घडलेला होता. त्या काळात सदर ठिकाणी एकूण एक सरस इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होत होते आणि प्रेक्षकही भरपूर दाद द्यायचे. एकेदिवशी दुपारी साडेतीनच्या खेळाला मी सुद्धा चित्रपट पाहण्यासाठी गेलो. थिएटर भरलेले होते आणि चित्रपट सुरू होण्याअगोदर तेथे भारतीय समाचार चित्र चालू होते. त्यास लोक इंडियन न्यूज म्हणून संबोधायचे.

यावेळी गांधीजींची दांडी यात्रा यावर आधारित चित्रपट सुरू होता व तो दोन भागांचा असल्याने लोक कंटाळले होते. हळूहळू लोकांनी थिएटरमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि ते चालू चित्र समाचार बंद करून मूळ सिनेमा चालू करण्यासाठी गोंधळ घालू लागले. त्या समाचार चित्रातही एका सभेच्या ठिकाणी मंचावर गांधीजी बसलेले असताना लोक गोंधळ घालत असतानाचे चित्रण होते. गांधीजी त्या लोकांना हात उंचावून गप्प बसण्याची ताकीद देत होते. 

तो प्रसंग पाहून थिएटरमधील प्रेक्षक अजून गोंधळ करू लागले आणि इतक्यात कॅमेरा गांधीजींवर फोकस होऊन ते तोंडावर बोट ठेवून सर्वांना शांत बसण्याचे संकेत देताच थिएटरमधील प्रेक्षकांत प्रचंड हंशा पिकला. चित्रपटातील लोकही शांत झाले आणि थिएटरमधलेही लोक गप्प बसून सदर समाचार पत्र पाहू लागले. त्यानंतर मात्र कोणीही ब्र काढला नाही आणि पूर्ण चित्रपट संपल्यानंतर मुख्य चित्रपट सुरू झाला.

मी अवाक् झालो आणि विचार केला. गांधीजी निरोप घेऊन चाळीस वर्षे झाली असतील, पण आजही त्यांचा प्रभाव जनमानसावर कसा कायम आहे. तो प्रसंग त्यांचे महान होण्याचे एक छोेटेसे प्रमाण असून, आजही मी तो प्रसंग अनेकदा अनेकांना ऐकविला आहे. पण माझ्या मनातील चलबिचल, कालवाकालव तीस वर्षे झाली तरी ती गोष्ट, तो क्षण माझे मन विसरायला तयार नाही.कारण, गांधीजी हे आम्हा भारतीयांच्या मनात आणि रोमारोमात भिनलेले असून, त्यांच्या छबीच्या एका इशाºयाने आम्ही गप्प बसतो, यापेक्षा त्यांचे महात्म्य किती विशाल आणि भक्कम होते, हे नमूद करण्यासारखे आहे. 

असले क्रांती राजकारण, कटकारस्थान यामुळे त्यांना आयुष्यातून उठविण्यात आले. असे भ्याड कृत्य करणारे लोक हे  विसरतात की माणूस मरतो, विचार मरत नाहीत. जोपर्यंत भारताचं अस्तित्व आहे तोपर्यंत गांधी मरणार नाही, तो सदा पिढ्यान्पिढी जिवंत राहणार आहे. भारतीय जन अमर रहे! गांधीजी अमर रहे!! भारत देश अमर रहे जय हिंद !!!- वाय. एम. बेग (लेखक कामगार चळवळीचे अभ्यासक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरMahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत