पंढरपूर : शिवसेना मित्र पक्षांना एकत्र घेऊन काम करत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यावर सरकार पडेल असा दावा केला होता, परंतु शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. यात विजय मिळाल्याने पहिल्या चाचणीत महविकास आघाडी यशस्वी झाली असल्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले.
पंढरपूर येथे आमदार भालके यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, साईनाथ अभंगराव, सुधीर अभंगराव, महावीर देशमुख, संदीप केंदळे, लंकेश बुराडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे देसाई म्हणाले, शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणुकीत ई एम व्ही मशीन नव्हती. मत पत्रिकेवर मतदान झाले. या निवडणुकीत मतदाराचा कल कुणाकडे आहे, हे कळाले आहे.
पदवीधर मतदार संघाच्या भाजपाच्या पारंपारिक जागेवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. मात्र स्वतः च्या पक्षात काही पडझड होऊ नये. काही पक्ष सोडून कोणी जाऊ नये. यासाठी महाराष्ट्रावर पुन्हा भाजपाचे सरकार येणार, महाविकास आघाडीचे सरकार पडणार असा कांगावा भाजपा करत असल्याच्या शंभूराज देसाई यांनी सांगितले.
पोलिस सहभागी असेल तर त्यांच्यावरही कारवाई
चंद्रभागा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. या वाळू चोरीची व्यवसायात काही पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याच्या अनेक तक्रारी उपलब्ध झाले आहेत. वाळू चोरी हा महसूलच्या आकतरीतला विषय आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी बैठक घेऊन वाळू चोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करू. कारवाईसाठी महसूल विभागाला पोलीस प्रशासन सहकार्य करेल. पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.