करमाळा तालुका व शहर ओबीसी महासंघाची बैठक झाली. या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींचे आरक्षण रद्द केले. तर ओबीसी सत्ता केंद्राच्या बाहेर पडले जातील. ओबीसी समाज हा दबलेला असून घटनेने दिलेले आरक्षण तब्बल ५० वर्षांनी ओबीसी समाजाला मिळाले. ओबीसीला आरक्षण मिळाल्यामुळे ओबीसी समाजातील अनेकांना विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली. पण आता हे आरक्षण रद्द केल्यामुळे ओबीसींना कुणीही प्रतिनिधित्व देणार नाही. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण नाही दिले, तर मतदानावर बहिष्कार करण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला.
यावेळी महेश चिवटे, हरी कोकाटे, गणेश चिवटे, दिलीप भुजबळ, भर्तरीनाथ अभंग, धुळा कोकरे, रवींद्र कोकरे, बंडू शिंदे, प्रा. अर्जुनराव सरक, शुभम बंडगर, सुनील सावरे, सागर गायकवाड, पंकज परदेशी, प्रकाश क्षीरसागर, मोहम्मद हाफिज कुरेशी, शौकत नालबंद आदी उपस्थित होते.
----