शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

नरेंद्र मोदी यांच्या सभेचा मोठा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 4:21 PM

लोकसभा निवडणुक ; अकलूजच्या सभेमुळे रणजित निंबाळकर, जयसिद्धेश्वर स्वामींना मिळाली ताकद

ठळक मुद्दे‘लाव रे व्हिडिओ’ म्हणून राज ठाकरेंनीही सोलापुरात सभा घेतली. त्याला प्रतिसादही जोरदार मिळाला होताशरद पवार यांनीही दोन्ही मतदारसंघात सभा घेतल्या. टेंभुर्णी, करमाळा, सांगोला, फलटण, नातेपुते, सोलापूर या ठिकाणी सभा घेतल्यामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर, अकलूज, फलटण, अक्कलकोट येथे सभा घेतल्या.

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  अकलूज येथे सोलापूर लोकसभेच्या मतदानापूर्व एक दिवस अगोदर झालेली सभा महत्त्वाची ठरली.

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि बारामतीच्या उमेदवार रंजना कुल यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अकलूज येथे सभा घेतली. या सभेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. या सभेने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले.

माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने कोणतीही कसर ठेवली नव्हती. अकलूज येथील सभेस माढा लोकसभा मतदारसंघासह सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या सभेत मोदींनी केलेले आवाहन त्याचप्रमाणे त्यांनी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचा केलेला गौरव यामुळे निर्माण झालेले वातावरण शेवटपर्यंत कायम राहिले.या सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा सत्तेवर येणार असल्याचे कळाल्यानेच पवार यांनी माघार घेतली असल्याची टीका केली होती. त्यामुळे आपसूकच पवार विरोधकांमध्ये चांगला संदेश गेला.

मोदी यांच्या सभेला विरोध झाला असतानाही ही सभा झाली आणि त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर आणि  डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी या दोघांना याचा मोठा फायदा झाला.

मुख्यमंत्र्यांची सभामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर, अकलूज, फलटण, अक्कलकोट येथे सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी विरोधकांना जोडण्याचे काम केले. त्याचा फायदा दोन्ही उमेदवारांना झाला. मुख्यमंत्र्यांना या मतदारसंघात विशेष रस होता.

पवारांची सभाशरद पवार यांनीही दोन्ही मतदारसंघात सभा घेतल्या. टेंभुर्णी, करमाळा, सांगोला, फलटण, नातेपुते, सोलापूर या ठिकाणी सभा घेतल्या. मात्र या सभांचा फायदा दोन्ही उमेदवारांना म्हणावा तसा होऊ शकला नाही.

राज ठाकरेंची सभा‘लाव रे व्हिडिओ’ म्हणून राज ठाकरेंनीही सोलापुरात सभा घेतली. त्याला प्रतिसादही जोरदार मिळाला होता. मात्र काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या मतांमध्ये त्याचे परिवर्तन होऊ शकले नाही. परिणामी हवा होऊ शकली नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरे