लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : कार्तिक वारीसाठी राज्याच्या विविध भागांतून येणाºया भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास न होता कामा नये़ त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे़ सर्व अधिकाºयांनी आपल्याला दिलेली जबाबदारी नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावी आणि ही वारी निर्मळ अन् भक्तीमय होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी केले़पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे प्रशासकीय अधिकाºयांच्या कार्तिकी यात्रा आढावा बैठकीत ते बोलत होते़ या बैठकीस प्रांताधिकारी डॉ़ विजय देशमुख, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, सहा़ पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. टी. राऊत, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, मुख्यधिकारी अभिजीत बापट, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, नपाचे प्रशासन अधिकारी सुनील वाळूजकर, न.पा़ चे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल जोशी, मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक रवींद्र वाळूजकर, मंदीर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, सचिन अधटराव, सदस्या शकुंतला नडगिरे आदी उपस्थित होते.कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगून डॉ़ अतुल भोसले म्हणाले, त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंदिर समितीच्या वतीने वारकºयांसाठी पाण्याचे एटीएमचे, प्रायोगिक तत्वावरील टोकन दर्शन सुविधेचे आणि सुलभ स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे़याशिवाय सार्व़ बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कासेगाव ते तनाळी या ६ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे़ मंदिर समितीचे अध्यक्ष फक्त मंदिराच्या विकासाकडेच लक्ष देतात असे कोणाला वाटू नये म्हणून आपण शहर, तालुक्याच्या विकासाकडे देखील लक्ष देत आहोत, असे डॉ. भोसले यांनी सांगितले़बैठकीनंतर डॉ़ अतुल भोसले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व मंदिर समितीच्या अधिकाºयांनी मंदिर परिसर आणि शहरातील विविध भागांची पाहणी केली़कॅनडा सरकारच्या ली असो़ चे अधिकारी पंढरीतकॅनडा सरकारच्या ली असोसिएटचे अधिकारी सध्या पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत़ कार्तिकी यात्रा काळात ते शहराची पाहणी करणार आहेत़ वारीसाठी देशभरातून वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात़ तेव्हांची गर्दी कशी असते आणि आलेल्या भाविकांना कोणत्या सुविधा दिल्या पाहिजेत, याबाबतची नोंदी ते घेणार असल्याचे डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले. सहअध्यक्षाचा निर्णय अभिनंदनीयराज्य सरकारने मंदिर समितीला सहअध्यक्ष नेमण्याचा जो निर्णय घेतला तो खरोखरच अभिनंदनीय आहे़ मंदिर समितीचा आवाका पाहिल्यास आणि शहराच्या विकासासाठी हे पद असणे आवश्यक होते़ यामुळे आता मंदिर परिसर आणि शहरातील विकासकामांना गती येईल, असे डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले़
कार्तिक वारी निर्मभ व भक्तीमय करा, अतुल भोसले, पंढरपूरात कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 5:55 PM
कार्तिक वारीसाठी राज्याच्या विविध भागांतून येणाºया भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास न होता कामा नये़ त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे़ सर्व अधिकाºयांनी आपल्याला दिलेली जबाबदारी नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावी
ठळक मुद्देकार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणारकॅनडा सरकारच्या ली असोसिएटचे अधिकारी सध्या पंढरपूरमध्ये दाखल कार्तिकी यात्रा काळात ते शहराची पाहणी करणार