कन्नड साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कन्नड साहित्य परिषद राज्याध्यक्ष गु. रू. चनबसप्पा यांनी १९९३-९४ साली महाराष्ट्र गडिनाड कन्नड साहित्य परिषद शाखेची स्थापना केली.? पहिले अध्यक्ष ताळजे वसंतकुमार हे होते. डॉ. जी. डी. जोशी, एच. पी. एल राव, बसवराज यांनी बिनविरोध अध्यक्ष पद भूषविले. आता महाराष्ट्र राज्याच्या शाखेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत मल्लिकाजप्पा मड्डे हे निवडणुक लढवत आहेत.
कन्नड साहित्य परिषद बेंगळूरु या संस्थेची स्थापना म्हैसूरचे महाराज यांनी १९१५ मध्ये केली होती.
या पत्रकार परिषदेस सुनील सवळी, सिद्धूराम गोब्बूर, प्रकाश प्रधान, धानप्पा हसरमनी, मल्लिनाथ वच्चे, भीमाशंकर सलगर, गिरमलप्पा भरमा, शिवचलप्पा मुंडोडगी, नीलकंठ मेंथे, सायबण्णा जाधव, ओंकार बरूर, लक्ष्मन बुरूड, दयानंद बमनळी, अ. बा. चिकमणुर, प्रकाश गोब्बुर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
-----