कुसळंब : बार्शी तालुक्यातील ममदापूर येेथे चोरट्यांनी बंद घर फोडून २ लाख ७२ हजारांचा ऐवज पळविला. रोख रक्कम आणि दागिन्यांसह दोन लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला.
याप्रकरणी सूर्यकांत महालिंग होडगी (वय ३३, रा. मोरे वस्ती, ममदापूर, ता. बार्शी, जि.सोलापूर) यांनी बार्शी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रविवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घर फोडल्याचे निदर्शनास आले.
होडगी हे सहकुटुंब शनिवारी जेवणानंतर मुख्य घराला कुलूप लावून बाजूच्या खोलीत झोपी गेले होते. शेतात पाणी देण्यासाठी जायचे असल्याने होडगी यांची पत्नी अंजली सकाळी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान उठल्या. बेडरुममधून उठून त्या किचनमध्ये गेल्या असता त्यांना कुलूप कोयंडा तुटून खाली पडलेला दिसला. चाेरट्यांनी लोखंडी कपाटाचे ड्रॉव्हर आणि त्यातील साहित्य अस्ताव्यस्त टाकून सोन्याचे दागिने काढून घेतले. १ लाख ३५ हजारांचे तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, २२,५०० रुपयांची सोनसाखळी, १३,५०० रुपयांची दुसरी सोनसाखळी, कर्णफुले, झुबे, सोन्याचे बदाम, गंठण, नऊ हजार रुपयांच्या दोन ग्रॅम वजनाचे डोरले, सोन्याची मणी, नथ, पैंजण असा ऐवज घेऊन फरार झाले. यानंतर चोरट्यांनी शेजारी राहणाऱ्या उर्मिला हरिश्चंद्र खळतकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला. त्यांच्या घराचे कुलूप तोडून दागिन्यांसह रोकड पळविली.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करीत आहेत
---
दोन पथके नेमली
या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल हे दोन्ही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तपास कामासाठी श्वान पथकाचीही मदत घेतली. चोरीच्या पद्धतीवरुन त्यांनी संशयितांचा अंदाज घेतला. सहायक पोलीस निरीक्षक तोरडमल यांनी दोन पतके नेमली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसट, पोलीस नाईक पांडुरंग मुंडे, उमेश कोळी, सुनील बोधनवाड यांचा समावेश असून ही पथके उस्मानाबाद, तुळजापूर, ढोकी, कळंब, भूम, परंडा, तेरखेडा या भागात रवाना रवाना केली.
----
फोटो : १३ कुसळंब
चोरट्यांनी ममदापूरमध्ये दोन घरफोड्यात कपाट उचकटून दागिने आणि रोकड लांबविली.