सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पायल सुग्रीव लोंढे या इतर महिलांसह भीमा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी जय जाधवही त्यांच्याबरोबर होता. या दरम्यान जय याला पोहायला येत नव्हते, त्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी पायल या गेल्या; मात्र ते दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. ही माहिती पायल यांच्या पतीला समजताच त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवून दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र ते मिळून आले नाहीत. यानंतर गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर, पोलीस पाटील सुनील कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी प्रशासकीय पातळीवर दोघांची स्पीड बोटच्या त्या दोघांची शोधमोहीम सुरू ठेवली आहे. पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे, शेगाव दुमाला, अजनसोंड, सुस्ते येथील ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांना लक्ष ठेवण्यास दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
:::: तीन दिवसांपूर्वीच भाचा आला होता मामाकडे ::::
कासेगाव (ता. पंढरपूर) येथील जय दत्ता जाधव (वय १२) हा मागील तीन दिवसांपूर्वी त्याचा मामा सुग्रीव लोंढे यांच्याकडे चिंचोली भोसे येथे राहण्यासाठी आला होता. जय हा त्याची मामी पायल लोंढे यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांसह भीमा नदीच्या पात्राजवळ गेले होते. अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले व पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. या घटनेमुळे कासेगाव व चिंचोली भोसे या दोन्ही गावांत हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो : चिंचाेली भोसे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रातून दोघे वाहून गेल्यानंतर पाहणी करताना गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पोलीस निरीक्षक किरण अवचर, पोलीस पाटील सुनील कांबळे उपस्थित होते.
फोटो : पायल लोंढे
फोटो : जय जाधव