शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

खाकी वर्दीतली माणूसकी; स्वत:चीच मुलगी समजून त्या पोलिसांनी तिची ओटी भरून सासरी पाठवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 4:59 PM

मोडलेला संसार पोलिसांनी जोडला; अन् पत्नी नांदण्यास जाताना भारावले नातेवाईक

ठळक मुद्देदुरावलेल्या पती-पत्नीस समुपदेशन; मोहोळ पोलिसांनी साडी-चोळी देऊन केली बोळवणकिरकोळ कारणावरून झाले होते भांडण : पत्नी नांदण्यास जाताना भारावले नातेवाईकपती-पत्नीमधील किरकोळ भांडणामुळे माझ्या भावाच्या मुलीचा मोडलेला संसार पुन्हा जोडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले़

अशोक कांबळे 

मोहोळ : पती-पत्नीच्या किरकोळ भांडणावरून एक वर्षापासून दुरावलेल्या त्या दाम्पत्याचे समुपदेशन केले़ त्यानंतर मुलीला सासरी पाठविताना मोहोळपोलिसांनी साडी-चोळी देऊन बोळवण करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

चौसाळा (ता. जि. बीड) येथील सासरकडील सासू छाया सुभाष बारवकर, सासरे सुभाष त्रिंबक बारवकर, पती विकास सुभाष बारवकर, जाऊ नीता मनोज बारवकर, नणंद सोनाली आनंद निनाळे हे सर्व जण माहेराहून पैसे आणण्याच्या कारणावरून छळ करीत होते़ तसेच सोडचिठ्ठी दे म्हणून मानसिक त्रास देत होते, अशी तक्रार वैशाली विकास बारवकर (माहेर पाटकूल, ता़ मोहोळ) मोहोळ पोलीस ठाण्यात दिली होती़ या तक्रारीची तातडीने दखल घेत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पीडित महिलेसह त्यांचे नातेवाईक व पतीकडील मंडळींना बोलावून घेतले.

 महिला पोलीस कर्मचारी अनुसया बंडगर यांनी माहिती घेऊन पती-पत्नीमधील भांडणाचे कारण सूर्यकांत कोकणे यांच्या निदर्शनास आणून दिले़ त्यानंतर त्यांनी पती-पत्नीसह त्यांच्या दोन्हीकडील नातेवाईकांचे समुपदेशन केले़  कोकणे व बंडगर यांच्या समुपदेशनामुळे पती-पत्नीमध्ये झालेले समज, गैरसमज दूर झाले़ एक वर्ष त्यांच्यामध्ये निर्माण झालेले अंतर क्षणात नाहीसे झाले आणि वैशाली नांदण्यास जाण्यास कबूल झाली़ पती-पत्नीसह दुरावलेला परिवार एकत्र आला.

हा प्रसंग पाहून सूर्यकांत कोकणे यांनी तालुक्यातील मुलगी आहे म्हणून तिला पोलीस ठाण्यातच मुलीप्रमाणे साडी-चोळी देऊन बोळवण करून तिच्या सासरकडील लोकांबरोबर नांदण्यास जाण्यासाठी २० जानेवारी रोजी पाठवून दिले. तेव्हा दोन्ही परिवारांनी आनंदाश्रू काढत पोलिसांचे आभार मानले़ 

मोडलेला संसार पुन्हा जोडला- पती-पत्नीमधील किरकोळ भांडणामुळे माझ्या भावाच्या मुलीचा मोडलेला संसार पुन्हा जोडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले़ त्यामुळे ते अधिकारी नसून त्या मुलीचे वडील आहोत, अशी आत्मीयता पोलिसांनी दाखवली़ इतकेच नाही तर स्वत:चीच मुलगी समजून तिची ओटी भरून पाठवले. पोलीस खात्यात काम करताना अशाच प्रकारची भूमिका सर्व अधिकाºयांनी घेतली तर भविष्यात किरकोळ कारणावरून होणारे घटस्फोट, मोडणारे संसार पुन्हा जोडण्यास निश्चित मदत होईल, अशा भावना मुलीचे चुलते संभाजी सातपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Solapurसोलापूरmohol-acमोहोळmarriageलग्नPoliceपोलिस