सोलापूर - आषाढी यात्रा दरवर्षी आषाढ शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन २०२१ यावर्षी आषाढी मंगळवार २० जुलै, २०२१ रोजी आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक श्रीची शासकीय महापूजा केली जाणार आहे. मुख्यमंत्री यांच्या सोबत श्रीच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शन रांगेतून निवडला जातो व त्यांना शासक महापूजेची संधी दिली जाते. तथापि, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, आषाढी यात्रा कालावध विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची मुख्यमंत्रीच्या शुभहस्ते होणा-या शासकीय महापूजेसाठी माना वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता.
त्यानुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहारा देणा-या एकूण ८ विणेक-यांपैकी २ विणेक-यांना मागी वर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला संधी मिळाली होती. तसेच ४ विणेक-यांचा सेवेचा कालावधी एक वर्षापेक्षा कमी असल्याने केशव शिवदास कोलते व बापू साळुजी मुळीक या दोन विणेक-यांपैकी पांडूरंग (ईश्वर) चिट्टीने केशव शिवदास कोलते (वय ७१ वर्षे, रा. मु. संत तुकाराम मठ, वार्ड नं. १५, नवनाथ मंदिर पाठीमागे वर्धा, ता.जि. वर्धा) यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे. कोलते हे मागील २० वर्षापासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहेत. स्वतः व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत. यावेळी मा. सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज ओसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर). ह.भ.प. प्रकाश नवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. त्याप्रमाणे केशव शिवदास कोलते (वय ७१ वर्ष) व इंदूबाई केशव कोलते (वय ६६) या दापत्याची आषाढी एकादशी दिवशी पहाटे मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते होणा-या श्रीच्या शासकीय महापुजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवडण्यात आले आहे.