लस घेण्यासाठी सर्वच प्रा.आराेग्य केंद्रावर सायंकाळपर्यंत लागल्या रांगा
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यासाठी प्रथमच ३७७० इतकी कोरोनाची लस प्राप्त झाल्याने शहरासह ग्रामीण भागात लस घेण्यासाठी नागरिकांनी सायंकाळपर्यंत प्राथमिक केंद्रांवरून गर्दी केल्याचे चित्र होते.
मंगळवेढा तालुक्याला कधी नव्हे ती प्रथमच ३ हजार ७७० इतकी कोरोना लस मंगळवारी प्राप्त झाली होती. ही लस आल्याचे समजताच नागरिकांनी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय व ग्रामीण भागातील प्रत्येक आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी केली होती. आंधळगाव ७१, भोसे ७४, मरवडे ६६, सलगर ४२, बोराळे ६५, ग्रामीण रुग्णालय ३९ असे एकूण ३७७ लसीच्या बॉटल देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही लस सर्व १८ वर्षांच्या पुढील नागरिकांना देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने गरोदर माता, अपंग, वृद्ध यांना प्राधान्य देण्यात आले. मंगळवारी ४० टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला, तर ६० टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. या लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
ओळी :::::::::::::::
मरवडे येथे लसीकरण केंद्रावर लस देताना टिपलेले छायाचित्र.