सोलापूर : मंगळवेढा पोलीस ठाणेची हद्द् कर्नाटक राज्यास लागून असल्याने चडचणहुन मंगळवेढामार्गे नेहमी चोरून अवैध गुटखा वाहतुक इतर शहरात व तालुक्यात होत असते. अनेकदा प्रयत्न करूनही सदर अवैध गुटखा पकडला जात नव्हता. कारण सदरची वाहतुक ही चोरटया मार्गे मालवाहतुक गाडीतुन पुढे वॉचर नेमुन केली जाते. त्यामुळे मंगळवेढा पोलीस ठाणेचे समोर अवैध गुटखा पकडणे हे एक या आव्हान होते.
तरी परंतु मा. पोलीस निरीक्षक ररणजीत माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढली की, मौजे चडचण (कर्नाटक राज्य) येथुन हरीदास शिवाजी मोटे हा त्यांचे मालकीची कार नंबर एम. एच. १४ डी. जी. ०२७६ मधुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा हुलजंतीमार्गे नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे घेवून येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्वतः पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी त्यांच्यासोबत खाजगी वाहनातून पोलिस नाईक दयानंद हेंबाडे, पोकॉ/मळसिध्द कोळी, पोकॉ/समाधान यादव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोना/सुनिल मोरे हुलजंती शिवारातील शिवनगी फाटा येथे सापळा लावुन थांबले असता रात्रौ २३:०० वा. चे सुमारास उमदीकडुन शिवनगी फाटयाचे दिशेने संशयीत कार एम. एच. १४ डी. जी. ०२७६ ही आल्याने तिचा सुमारे १ किलोमीटर पाठलाग करून थांबवुन सदर गाडीचे चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव हरीदास शिवाजी मोटे (रा. नंदेश्वर ता. मंगळवेढा जि. सोलापुर) असे असल्याचे सांगीतले. सदर कारची तपासणी केली असता त्यामध्ये पांढरे रंगाचे पोत्यामध्ये सुगंधी पान मसाला व तंबाखु पाकीटे, आर. एम. डी. पान मसाला पाकिटे असे एकुण १९६,०००/- रू. किमतीचा माल व कार २,०००००/-रु. असा एकुण ३९६,०००/-रु. किमतीचा माल मिळुन आल्याने सदर वाहन त्यामधील गुटखा व गाडीतील चालक यांना मंगळवेढा पोलीस ठाणे येथे हजर केले करून अन्न व औषध प्रशासन, सोलापुर यांना कळवुन पुढील कारवाई करून अन्न व औषध प्रशासना मार्फत फिर्याद दाखल केली असुन पुढील तपास पोहेकॉ/ येलपले करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोना दयानंद हेंबाडे, पोकॉ/मळसिध्द कोळी, पोकॉ/ समाधान यादव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोना / सुनिल मोरे यांनी केली आहे.