पोपट पुजारी (२२), लहू शिरगूर (२0), सतीश शिंदे (२0), शिवाजी भोपळे (२३), नाना घोडके (२२), आकाश गायकवाड (२२), गणेश साळुंखे (१७), सतीश पुजारी (३३), सिद्धेश्वर शिंदे (१६), विजय चौंडे (१६), योगेश शिरगूर (११), समाधान शिरगूर (१७), किरण बनसोडे (१६), संतोष नागणे (३२), शीतल पुजारी (२७), अमीर मुजावर (१३).डॉक्टरांची मोठी टीमविषबाधेतील रुग्णांना सोलापूरला हलविण्यात येणार असल्याची माहिती १0 वाजता मिळताच प्रभारी अधिष्ठाता डॉ. घाटे यांनी डॉक्टरांची टीम तयार ठेवली होती. बाधित रुग्ण येईल तसे वॉर्डात ॲडमिट करण्यात आले. अगोदरच सलाईन व औषधांचा साठा मागविण्यात आला होता. डॉ. एस. ए. सांगळे, डॉ. विठ्ठल धडके, डॉ. एम. ए. जमादार, डॉ. शुभांगी धडके, डॉ. नीलिमा देशपांडे, निवासी डॉक्टर रेश्मा बद्री, शरद पाटील, वाहिद, अमर, अमोल, भंडारी, बंदीछोडे, बोरी यांचे पथक कामाला लागले होते. याचबरोबर परिचारिका व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. आरोग्य विभागाने पुण्याचे पथक पाठवू काय अशी विचारणा केली पण सिव्हिलची टीम सक्षम असल्याचे डॉ. घाटे यांनी सांगितले. आमदार प्रणिती शिंदे, महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री यांनी भेट देऊन रुग्णांच्या व्यवस्थेची माहिती घेतली. विषाणूंच्या संसर्गामुळे फैलावउन्हाळ्यात विषाणू (व्हायरस) व बॅक्टेरिया ( संसर्गजन्य जंतू) मोठ्या प्रमाणावर कार्यरत होतात. दूषित पाणी किंवा अन्नातून इन्फेक्शनमुळे उलट्या, जुलाबाचा त्रास होतो. यातून रुग्णाच्या अंगातून पाणी जाते. इन्फेक्श्न वाढल्यावर डोके दुखून ताप येतो. त्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका संभवतो. चपाती ठरली कारणीभूतअन्न व औषध प्रशासनाने रुग्णांनी सोमवारी प्रसाद म्हणून खाल्लेल्या अन्नाचे नमुने घेतले आहेत. त्यात चपातीच्या नमुन्यात दोष आढळला आहे. राजाराम भुसनूर यांच्या घरी वालग्याचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर सर्वांनी प्रसाद म्हणून भात,भाजी, चपाती असे जेवण केले. आचारी शिवाजी दुबल यांनाही विषबाधा झाली आहे. मुलांचा टाहो....विषबाधा झालेल्यांमध्ये ६ ते १७ वयोगटातील मुलांची संख्या मोठी आहे. एकाचा मृत्यू झाल्याचे कळताच मुले घाबरली. तशात ॲम्ब्युलन्समधून सोलापूरला आणल्यावर ती रडू लागली. सलाईन, इंजेक्शनचाही काही जणांनी धसका घेतला. डॉक्टरांनी मुलांना धीर दिला. मुलांबरोबर त्यांचे नातेवाईक ठाण मांडून होते. मुले लवकर बरी व्हावीत अशा काळजीत ते होते.
आंबे विषबाधा-------------
By admin | Published: May 08, 2014 7:45 PM