सोलापूर : लॉजवरील वादाचे रूपांतर हाणामारीत आणि त्यानंतर जातिवाचक शिवीगाळीत झाल्याने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे व त्यांचे पुत्र बाबासाहेब सपाटे यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त माधव रेड्डी यांनी दिली. मनोहर सपाटे अटकेत असून बाबासाहेब सपाटे हा फरार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
यातील फिर्यादी किरण साळवे हे सपाटे यांच्या शिव-पार्वती लॉजवर मॅनेजर आहेत. गुरुवारी (ता. 14) पहाटे एक-दोनच्य सुमारास ही मारहाण झाली. त्याची माहिती समजताच सपाटे हे त्या ठिकाणी पोचले. त्यांनी दोघांचे भांडण सोडवले. शुक्रवारी सकाळी आपण बघू, असेही त्यांनी सांगितले होते. तरीपण साळवे यांनी थेट दोघांवर अॅट्रॉसिटीची फिर्याद दिली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्या वेळी बाबासाहेब सपाटे यांनी साळवे यांना जातिवाचक शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर किरण साळवे यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुरुवारी धाव घेतली.