राकेश कदम, साेलापूर : मराठा आरक्षण आंदाेलकांनी साेमवारी दुपारी १२ वाजता काेकण विभागाचे भाजपचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि शिक्षणाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहातील बैठक उधळून लावली.
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साेलापूर दाैऱ्यावर आहेत. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात आमदार म्हात्रे यांनी बैठक बाेलावली हाेती. जिल्हा परिषद, महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अधिकारी या बैठकीला आले हाेते. या बैठकीची माहिती मराठा आंदाेलकांना मिळाली. ‘जय जिजाउ, जय शिवराय’ च्या घाेषणा देत मराठा आंदाेलक विश्रामगृहात आले. या ठिकाणी मराठा आंदाेलनावर चर्चा करण्यासाठी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक सुरू हाेते. मराठा आंदाेलक आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते बैठकीच्या खाेलीत पाेहाेचले. मराठा आरक्षण जाहीर हाेत नाही ताेपर्यंत आमदार, खासदारांना बैठका घेण्यास मनाई केली आहे. मनाेज जरांगे यांच्यासह अनेक लाेक अन्न,पाणी त्याग करुन आंदाेलन करीत आहेत. तरीही तुम्ही बैठका का घेताय अशी विचारणा केली. अखेर ही बैठक थांबली आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे विश्रामगृहात निघून गेले.