सोलापूर : मागील अनेक वर्षांपासूनची मागणी असलेले मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायलयाने रद्दबातल ठरविल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून राज्यभर विविध आंदोलने सुरू झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला एसईबीसी किंवा ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यामातून भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा 4 जुलै रोजी सोलापूर शहरातून काढण्यात येणार आहे.
या मोर्चात सोलापूर शहर-जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मराठा बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व मराठा समाजाचे नेते, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील करणार आहेत. त्याचबरोबर या मोर्चासाठी छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे, खासदार नारायण राणे, शिवेंद्र राजे भोसले आदी प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेला मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील, सोलापूर जिल्हा समन्वयक राम जाधव, किरण पवार, श्रीकांत घाडगे, सोमनाथ राऊत, प्रताप कांचन आदी नेते उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख मागण्या :
• मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे हि प्रमुख मागणी आहे.
• कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद तात्काळ करावी.
• मराठा समाजातील युवकांसाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेलाला तात्काळ एक हजार कोटी रुपये देऊन त्याचे उपकेंद्र सोलापुरात सुरू करावे.
• मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून ते कोणत्याही संस्थेला न देता शासनाच्या नियंत्रणाखाली चालवावे.
• छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती चालू करण्यात यावी.
• मराठा आरक्षणासाठी ज्या मुलांनी आत्मदहन केले त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये मदत निधी द्यावा.
मराठा क्रांती मोर्चासाठी नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका दौरे काढण्यात येणार आहेत. 28 जून 2021 रोजी महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री. विठ्ठल रुक्मीणीचे दर्शन धेऊन तालुका दौऱ्याची सुरूवात होणार आहे.
28 जून 2021 रोजीचा दौरा
– पंढरपूर बैठक - वेळ - स. 10 वा.
मंगळवेढा बैठक - वेळ – दु. 2 वा.
सांगोला बैठक - वेळ – संध्या. 5 वा.
29 जून 2021 रोजीचा दौरा
माळशिरस (अकलूज) – स. 10 वा.
माढा – (कुर्डूवाडी) – दु. 3 वा.
करमाळा – सं. 6 वा.
30 जून 2021 रोजीचा दौरा
बार्शी – स. 10 वा.
मोहोळ - दु. 2 वा.
सोलापूर उत्तर-दक्षिण-शहर - सं. 6 वा.
1 जुलै 2021 रोजीचा दौरा
अक्कलकोट – स. 10 वा.
अक्कलकोटनंतर दुपारी 1 वा. सोलापूर येथे पत्र