पंढरपूर : कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते. मात्र, यंदा एक सोडून दोन उपमुख्यमंत्री असतानाही नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलपूजा होऊ देणारच नाही, अशी घोषणा सकल मराठा समाजाने समितीच्या बैठकीदरम्यान केली आहे. यावर पंढरपुरातील परिस्थिती शासनाला कळविण्यात येईल. शासनाकडून सूचना आल्याशिवाय कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही, अशी ग्वाही मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली. येत्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. तत्पूर्वी बुधवारी पंढरपूरमध्ये भक्तनिवास येथे नियोजनाची बैठक सुरू असताना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत बैठकीत आले. कार्तिकी एकादशीला मंदिर समितीने कोणत्याही उपमुख्यमंत्री, आमदार, खासदारांना निमंत्रित करू नये. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेवर घातलेली बंदी कायम राहील असे सांगत त्यांनी घोषणाबाजी केली.
कार्तिकी महापूजेसाठी उपमुख्यमंत्रीच नको, पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचा पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 11:54 AM