सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़ पोलीस आंदोलनकर्त्यांवर दडपतशाहीने वागत असल्याचे कारण करीत शिवाजी चौकात काही आंदोलनकर्त्यांनी पुन्हा दगडफेक करण्यास सुरूवात केली़ त्यानंतर पोलीसांनी पुन्हा आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली होती़ आंदोलनकर्त्यांना घोषणाबाजी करताना पोलीसांनी मज्जाव केल्याने शिवाजी चौकात दगडफेक करण्यात आली होती, त्यावेळी पोलीस उपायुक्तांची गाडी फोडली़ मात्र पुन्हा दुपारी दीडच्या सुमारास आंदोलन कर्त्यांवर पोलीसांकडून दडपशाही करीत असल्याचे कारण पुढे करीत पुन्हा दगडफेक केली़ यावेळी निराळे वस्ती, उमा नगरी आदी परिसरात पोलीसांनी कोम्बींग आॅपरेशन करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.