संजय शिंदे
सोलापूर : भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी ही एक भाषा असून, मातृभाषा असणाºयांच्या लोकसंख्येनुसार ही जगातील पंधरावी तर भारतातील तिसºया क्रमांकाची भाषा आहे.
मराठी भाषेचा इतिहासमराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने ‘विवेकसिंधू’ या काव्यग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. मराठीतील हा पहिला ग्रंथ मानला जातो. त्यानंतर शके १२१२ मध्ये ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. यानंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तिपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला.
१९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. मराठी साहित्यिकांनी १९९०च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला. सर्वांत जुना मराठी लेखनाचा पुरावा (इ.स. ७३९) सातारा येथे विजयादित्य काळातील ताम्रपट्टीवर आहे. श्रवणबेळगोळ, कर्नाटक येथे सर्वांत प्राचीन समजला जाणारा मराठी शिलालेख आहे. या शिलालेखात राजा गंगराय व त्याचा सेनापती चामुंडराय यांचे उल्लेख आहेत.
बोलीभाषामहाराष्टÑाच्या सीमावर्ती भागातील लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात ‘मराठवाडी’, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मालवणी’, नागपूर व वर्धा जिल्ह्यात ‘नागपुरी’, जामनेर व भुसावळ परिसरात ‘तावडी’, कर्नाटक-महाराष्टÑ सीमावर्ती भागात ‘चंदगडी’, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात ‘वºहाडी’ भाषा बोलली जाते. कोल्हापुरात ‘कोल्हापुरी’, तर बेळगाव परिसरात ‘बेळगावी’ भाषा बोलली जाते.