आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : पाणी फाउंडेशनच्या वतीने तिसºया वॉटरकप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज व भागाईवाडी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेल्या जिल्ह्यातील काही तालुक्यातील तसेच मराठवाड्यातील काही गावच्या प्रतिनिधींना येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.पाणी फाउंडेशनच्या वतीने मागील वर्षी घेण्यात आलेल्या वॉटरकप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्याची निवड करण्यात आली होती. यामध्ये भागाईवाडी, हिरज, बेलाटी, नान्नज, पडसाळी व राळेरास या गावांनी चांगले काम केले होते. त्यापैकी हिरज व भागाईवाडीच्या ग्रामस्थांनी झोकून देऊन पाणी अडविण्याची कामे श्रमदानातून केली होती. यामुळे स्पर्धेत भाग घेतलेल्या गावांत पाणी अडविण्याची कामेही झाली अन् पाणीही अडले आहे. सातत्याने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून भागाईवाडी व हिरजच्या ग्रामस्थांनी कामाचा ठसा उमटविल्याने पाणी फाउंडेशनने या दोन्ही गावांत अन्य गावांतील नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिरज गावाची व शिवाराची पाहणी करून प्रशिक्षक टीमने हिरजची प्रशिक्षण केंद्रासाठी निवड केली. त्याप्रमाणे भागाईवाडी गावाचीही पाहणी केली असून हे गावही प्रशिक्षणासाठी योग्य असल्याचे प्रशिक्षक टीमचे म्हणणे आहे. या दोन्ही गावात जिल्ह्यातील काही तालुक्यातील निवडलेल्या गावातील पाच प्रतिनिधी तसेच मराठवाड्यातील काही गावच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. चार दिवस चालणारे हे प्रशिक्षण निवासी असणार आहे.--------------------उत्तर तालुक्यातील काही गावांनी मागील वर्षी चांगले काम केल्याने ती गावे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास योग्य झाली. यावर्षी तालुक्यातील अधिक गावांत चांगले काम होईल, असा आमचा प्रयत्न राहील. गाव पातळीवर श्रमदान व अन्य कामात पदाधिकारी म्हणून भाग घेणार असून तालुक्यातील काही गावे राज्य पातळीवर चमकतील.-संध्याराणी पवारसभापती, पंचायत समिती उत्तर तालुका-------------------सोलापूरचे सहा तालुके...- सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व उत्तर सोलापूर हे दोन तालुके मागील वर्षी वॉटरकप स्पर्धेसाठी निवडले होते. यावर्षी सांगोला, मंगळवेढा, बार्शी, माढा, करमाळा व उत्तर तालुक्याची निवड तिसºया वॉटरकप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्वच गावांनी वॉटरकप स्पर्धेसाठी भाग घ्यावा व आपली गावे पाणीदार करावीत, असे आवाहन समन्वयक विकास गायकवाड यांनी केले आहे.
सोलापूरातील वॉटरकप स्पर्धेसाठी मराठवाड्यातील प्रतिनिधी घेणार उत्तर तालुक्यात प्रशिक्षण, हिरज, भागाईवाडीत प्रशिक्षण केंद्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 1:23 PM
पाणी फाउंडेशनच्या वतीने तिसºया वॉटरकप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज व भागाईवाडी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेल्या जिल्ह्यातील काही तालुक्यातील तसेच मराठवाड्यातील काही गावच्या प्रतिनिधींना येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ठळक मुद्देपाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटरकप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्याची निवड गाव पातळीवर श्रमदान व अन्य कामात पदाधिकारी म्हणून भाग घेणार सर्वच गावांनी वॉटरकप स्पर्धेसाठी भाग घ्यावा व आपली गावे पाणीदार करावीत : विकास गायकवाड