करमाळा : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून २ लाख रुपये आणावते म्हणून पती व सासू-सासरे व दीर यांनी मिळून विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी पाच जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी सानिया अस्लम शेख (वय २०, रा. सावंत गल्ली, करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.
सानियाचा विवाह अस्लम राजू शेख (रा. कलेढोण, शेखवस्ती ता. खटाव, जि. सातारा) याच्याबरोबर २०१८ मध्ये झाला होता. पतीने कसेबसे १५ दिवस सांभाळले. त्यानंतर पती अस्लम शेख, सासू रजिया शेख, सासरे राजू शेख, दीर शाहरूख शेख (सर्व रा. कलेढोण, शेखवस्ती, ता. खाटाव, जि. सातारा) यांच्याकडून मारहाण झाली. तसेच माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून जाचहाट सुरू केला. रात्री-अपरात्री घराबाहेर काढण्याचा प्रकार झाला. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.