पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनीगार इप्तेकार बेद्रेकर यांचा मुस्तकिम इस्माईल घोडेस्वार यांच्याशी विवाह झाला. विवाह दरम्यान इप्तेकार बेद्रेकर यांनी ५० हजार रुपये हुंडा दिला होता. तसेच विवाहासाठी इप्तेकार बेद्रेकर यांनी कपडे, सोने यासह अन्य खर्च मिळून एकूण ७ लाख रुपये खर्च केला होता. तीन महिन्यानंतर तुझ्या आई वडिलांनी फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन व कुलर दिले नाहीत, असे म्हणत सासू रेहना इस्माईल घोडेस्वार या मोहिनीगार यांना घालून पडून बोलून जाच करू लागल्या. या प्रकरणी मोहिनीगार यांनी सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दिली आहे.
पोलिसांनी पती मुस्तकिम इस्माईल घोडेस्वार, सासू रेहना इस्माईल घोडेस्वार, सासरा इस्माईल हबिबअल्ला घोडेस्वार, दीर बबलू इस्माईल घोडेस्वार (सर्व रा. जुनीपेठ, पंढरपूर) यांच्याविरुद्ध भा.दं.वि.क ४९८ (अ) , ३४ हुंडा प्रतिबंधक कायदा कलम ३ व ४ प्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास पो.ना. जमादार करीत आहेत.
---