कोरोना महामारीमुळे ग्रामीण क्षेत्राची होरपळ सुरू असतानाच दुसऱ्या लाटेत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणाऱ्या आठवडी बाजार बंदीमुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. यात भाजीपाला, पशुधन या प्रमुख घटकांसह काही घटकांच्या माध्यमातून दररोज कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण ठप्प झाली आहे. अनेक गावांप्रमाणे शहरातही मोजक्या ठिकाणी असा बाजार भरतो. विशिष्ट प्रकारच्या वस्तूंसाठी आजही काही ठिकाणचे बाजार प्रसिद्ध आहेत. धान्य बाजार, भाजी बाजार, जनावरांचा बाजार अशा बाजारांच्याा सुविधा व शिस्तीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूूूून देखरेख ठेवली जाते.
---
सध्या बाजार पद्धतीत आधुनिकतेमुळे मोठे बदल घडले आहेत. राज्यभरात बाजार समितीच्या माध्यमातून आधुनिकता आली. यानंतर बझार, शहरातील मॉल व सध्या सुरू असलेली ऑनलाईन बाजार पद्धती रुढ होत असली तरीही ग्रामीण भागात बाजारांची क्रेझ व होणारी उलाढात आजही कायम आहे.
देविदास ढोपे, सरपंच, पुरंदावडे
----
पारंपरिक बाजारांना कोरोनाची खीळ
वस्तूंची खरेदी - विक्री करण्याचे ठिकाण म्हणजे बाजार. हा शब्द पर्शियन भाषेतील; मूळ संस्कृत शब्द 'हट्ट', यावरून 'हाट' म्हणजे बाजार असा मराठी भाषेत रुढ झाला. बाजारांना जुनी परंपरा आहे. महाराष्ट्रातही अनेक बाजार वैशिष्ट्ये टिकवून आहेत. रोजंदारीवरील मजुरांना मजुरी बाजाराच्या दिवशी मिळते. या दिवशी पंचक्रोशीतील निरनिराळ्या गावांचे लोक एकत्र येत असल्याने सामाजिक स्वरूपाच्या देवघेवींचे अनेक व्यवहार पार पडतात. अशा पारंपरिक बाजारांना कोरोना महामारीने खीळ घातली आहे.