सोलापूर : मंद्रुप येथे उपबाजार आवार सुरू करण्यास सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. विषयपत्रिकेवरील २२ व आयत्या वेळचे २४ अशा ४६ विषयांना मंजुरी मिळाली.
बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या बैठकीत संचालकांनी अनेक विषयांवर चर्चा केली. अनेक वर्षांपासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे उपबाजार आवार सुरू करण्याची मागणी होती. प्रशासकाच्या कालावधीत त्यास मंजुरी देऊन जागा घेण्याचीही प्रक्रिया सुरू केली होती. मात्र प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने न्यायालयाने ही प्रक्रिया थांबवली होती.
संचालक मंडळ अस्तित्वात येताच पहिल्याच बैठकीत हा विषय मंजूर करण्यात आला. सोलापूर बाजार समितीमध्ये सोलापूरसह अन्य जिल्ह्यांतून येणाºया शेतकºयांना राहण्यासाठी निवासस्थान बांधण्याचा विषय संचालक जितेंद्र साठे व प्रकाश वानकर यांनी उपस्थित केला. त्याचा आयत्यावेळच्या विषयात समावेश करुन सर्वसोईनीयुक्त निवासस्थान बांधण्यास मंजुरी देण्यात आली. बाजार समितीमध्ये विजेची बचत करण्यासाठी सोलर बसविण्याची आवश्यकता असली तरी पणन मंडळाच्या आदेशात सोलापूरचा समावेश नाही.
अनुदान तत्वावर सोलर बसविण्यासाठी, सोलापूरचा समावेश करण्याचा प्रस्ताव पाठविण्यास मान्यता दिली. बाजार समितीच्या ठेवी सध्या कॅनरा बँक व स्टेट बँक आॅफ इंडिया या दोन बँकेत आहेत. या ठेवी मुदत संपतील तशा अधिक व्याज देणाºया बँकेत ठेवण्याचा निर्णय झाला.
सुरक्षेसाठी १०० गार्ड...- सध्या बाजार समितीसाठी ५० गार्डची मंजुरी आहे. ही संख्या अपुरी पडत असल्याने ही संख्या १०० करण्यास पणनकडे प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे सभापती माने यांनी सांगितले. ई-नाम प्रक्रिया सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. शेतकºयांचे पैसे न देणाºया व्यापाºयांवर कडक कारवाई करावी अशीही मागणी संचालकांनी केली.
नाशिक जिल्ह्यात उपबाजार आवार सुरू आहेत, त्याची पाहणी करुन मंद्रुप उपबाजार आवाराचा आराखडा तयार केला जाईल. महिनाभरात आम्ही पणन मंडळाला आराखडा सादर करु.-दिलीप मानेसभापती, सोलापूर बाजार समिती