सोलापूर/करमाळा : पूर्वी नवरी मुलीकडून नवऱ्या मुलास हुंडा देण्याची पद्धत रूढ होती. परंतु, आता ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांचे वय होऊन सुद्धा मुली मिळत नसल्याने मुलाकडून मुलीच्या कुटुंबीयांना हुंडा देण्याची वेळ आली आहे. शिवाय स्व:च्या जातीमधील मुली मिळत नसल्याने अंतरजातीय मुलींचा शोध घेण्याची वेळ पालकावर आली आहे. आपल्या राज्यात मुली मिळाल्या नाही तर परप्रांतात जाऊन विवाह करून यातून फसगत झाल्याची उदाहरणे घडली आहेत.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांचे वय होऊनही लग्न जमत नसल्याची मोठी समस्या पुढे आली आहे. याबद्दल आता युवक आणि त्याचे पालकही पुढे येऊन प्रतिक्रिया देत आहेत. मुलांच्या लग्नाची समस्या गंभीर बनत चालली आहे. माझे वय रनिंग चाळीस आहे. आमच्या समाजात एक तर मुलींची संख्या कमी आहे शिवाय मुलगा नोकरीला आहे का, तो शहरात आहे का अशी विचारणा होत असल्याने मी अद्याप ही लग्नाविना राहिलेलो आहे. आता नाईलाजाने मला आंतरजातीय विवाह करण्यापलीकडे दुसरा मार्ग दिसत नाही.
हर्षद मंत्री, अविवाहित तरुण करमाळा
हल्लीच्या मुली पुणे मुंबई सारख्या शहरात संसार करणे पसंत करीत आहेत. शहरातील आकर्षक संस्कृती व चंगळवादास प्रथम प्राधान्य दिले जात असुन ग्रामीण भागात शेतीत मुलींचे मन रमत नाही मुलींची मानसिकता पालकांनी बदलणे गरजेचे आहे.
दिपक पाटणे,औषध विक्रेता करमाळा.
सुशिक्षीत व उच्चभ्रू जाती-धर्मांमध्ये मुलींची संख्या मुलापेक्षा कमी आहे.वय होऊन ही लग्नासाठी मुली मिळत नाहीत यामुळे मुलींची चाँईस वाढली आहे.नोकरदार,शहरात राहणारा व आई-बापा पासुन वेगळा राहणा-या मुलांना पसंती दिली जात आहे. ग्रामीण मागात शेतक-यांच्या मुलाला मुलगु लग्णासाठी मिळत नाही.
विनोद गांधी,व्यापारी करमाळा कोट घेणे...
वय होऊन सुद्धा लग्नगाठ बांधली जात नसल्याने कर्नाटक, मध्य प्रदेश या परप्रांतात जाऊन लग्नाच्या मुलींचा शोध घेण्यासाठी फिरावे लागत आहे. लग्न जमविणारे मध्यस्थांना चहापाणी करून मानधन द्यावे लागत आहे. पसंत असलेल्या मुलीच्या कुटुंबियांना लाख- दोन लाख रुपये हुंडा देऊन मुलीशी विवाह करून घरी आणाल्याची कित्तेक उदाहरणे आहेत.
हमीद बागवान, भेळ विक्रेता करमाळा