सोलापूर : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्याशी लग्न अपत्य जन्मान घातले. याची खबर महिला बालकल्याण विभागास मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून आकाश दिलीप चव्हाण (वय- २६, रा. राजस्व नगर, विजापूर रोड सोलापूर) याच्याविरुद्ध शुक्रवारी अत्याचारासह , बाललैंगिक छळ, बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदला. ही घटना १० मे २०२२ ते ९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडल्याची फिर्याद बाल कल्याण विभागाचे किरण चंद्रकांत जाधव यांनी दिली.
फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, यातील पिडित बालिका अल्पवयीन असताना वरील आरोपीने १० मे २०२२ रोजी धाराशिव जिल्ह्यातील बालिकेशी शहरातील मंगल कार्यालयात लग्न केले. त्यानंतर संबंध आल्याने त्यांनी एका मुलीला जन्म दिला. कायद्यान्वये हा प्रकार गुन्हा ठरत असल्याने संबंधीत आरोपीविरुद्ध बालकल्याण विभागाच्या पथकाकडून शहानिशा करुन तक्रार दाखल केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या घटनेची फिर्याद नोंदविल्यानंतर सहा. पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे, सपोनि नामदे यांनी भेट दिली. पुढील तपास सपोनि नामदे करीत आहेत.