शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

अरणगावच्या महिलेने साधली किमया; तीन एकरात घेतले २१ टन सेंद्रिय पेरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 10:49 AM

खारघर बाजारात अरणगावचे फळ; वनमाला गायकवाड शेतकरी महिलेची यशोगाथा

ठळक मुद्देबार्शी तालुक्यातील अरणगाव येथील शेतकरी वनमाला गायकवाड या महिलेने ही किमया साधलीअरणगाव शिवारातील बहुतांश भागातील माती ही वीटभट्टीला विकली गेल्याने या भागाची मुरमाड म्हणून ओळख कमी खर्चाची पिके व फळबागेची लागवड करून आपली शेती जास्त फायद्यात

बालाजी विधातेकारी : गावचा शिवार तसा मुरमाडच... कुसळ उगवायला देखील मुश्कील... अशा जमिनीत फळबागेची लागवड केली. तीन एकरावर पेरूची लागवड केली़ या लागवडीपूर्वी मशागत आणि त्याच्याबरोबर रासायनिक खत पूर्णत: टाळून गोमूत्र, काळा गूळ, शेण आणि बेसन पिठाच्या मिश्रणातून जीवामृत वापरले़ अभ्यासू वृत्तीने केलेल्या लागवडीतून दहा महिन्यांत २१ टन सेंद्रिय पेरूचे फळ घेतले आहे़ आज ही फळं मुंबईतील खारघर परिसरातील बाजारात सर्वाधिक दराने विकली जात आहेत.

बार्शी तालुक्यातील अरणगाव येथील शेतकरी वनमाला गायकवाड या महिलेने ही किमया साधली आहे़ दोन मुलं अभियंते आहेत़ परंतु त्यांचा शिक्षणाकडे ओढा असल्याने त्या स्वत: शेतीकडे लक्ष देतात. अरणगाव शिवारातील बहुतांश भागातील माती ही वीटभट्टीला विकली गेल्याने या भागाची मुरमाड म्हणून ओळख निर्माण झाली आहे़ वनमाला यांना वडिलोपार्जित २० एकर जमीन आहे. शेतामध्ये पेरूच्या एक हजार रोपांची लागवड केली. या जमिनीमध्ये त्यांनी पेरू हे मुख्य फळ आणि याच्याबरोबरीने आंबा व   जांभूळ, बांबू अशी इतर पिके त्या घेताहेत.

त्यांनी संपूर्ण शेती ही सेंद्रिय पद्धतीने केली आहे. ८ बाय ८ अंतराने पेरूची रोपं लावली आहेत. फळाच्या वाढीसाठी कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला नसून, कीटकनाशक म्हणून गोमूत्र फवारले आहे. खताचा पूरक डोस म्हणून जीवामृतचा वापर केला आहे. हे तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने अंबविण्याची प्रक्रियाद्वारे वापरली आहे़ देशी गाईचे शेण, गोमूत्र, काळा गूळ आणि बेसन पीठ यांच्या मिश्रणातून हे तयार केले़ ही रोपं जगवण्यासाठी दीड एकर क्षेत्रात २़५ कोटी लिटरचे शेततळे उभारले आहे़ त्यात मत्स्यपालनही केले आहे. ठिबक सिंचनाचा आणि जीवामृतचा वापर केला आहे. याशिवाय आठवड्यातून दोन वेळा फवारण्या केल्या़ फळवाडीपोटी एकरी १५ हजार रुपये खर्च आला आहे.

कृषीभूषण पुरस्काराने गौरव - वनमाला गायकवाड यांच्या या प्रयोगशील शेतीची दखल घेऊन  बार्शी  कृषी पदवीधर संघटनेने घेऊन सन २०१९ चा ‘भगवंत कृषीभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कृषी सहायक बाळासाहेब चापले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून ही शेती विकसित करायला मदत केली आहे़ 

भविष्यात शेती फायदेशीर ठरणार आहे. परंतु शेतकºयाने प्रत्येक कामाचा हिशोब ठेवला पाहिजे. कमी खर्चाची पिके व फळबागेची लागवड करून आपली शेती जास्त फायद्यात कशी राहील, याचा विचार करणे गरजेचे आहे़ अभ्यासू वृत्तीने शेती केल्यास उत्पन्न वाढते, अपेक्षित निकाल हाती येतो.- वनमाला गायकवाड, पेरू उत्पादक महिला शेतकरी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfruitsफळेorganic vegetablesसेंद्रिय भाज्या