सोलापूर: व्यवस्थापन कोट्यातून एमबीबीएससाठी प्रवेश देतो म्हणून ५० लाख रुपयास गंडवणाºया इसमाविरुद्ध शिक्षक पित्याच्या तक्रारीनुसार पोलिसात गुन्हा नोंदला आहे. विजापूर नाका पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सोमवारी त्याला न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संदीप जवाहर शहा (रा. फुरडे रेसिडन्सी, फ्लॅट नं. १, विजापूर रोड, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजेसाब हुसेनसाब कोटनाळ (वय ५६, रा. विजापूर रोड, अत्तार नगर, सोलापूर) हे मरगूर (जि. विजयपूर) येथे शिक्षक आहेत. त्यांची पत्नीही सोलापुरात शिक्षिका आहेत. दोन मुले शिक्षण घेतात. मोठा मुलगा आसिफ याला एमबीबीएसला प्रवेश मिळवून डॉक्टर बनवण्याचे दोघांचेही स्वप्न होते. दोघांना मिळालेल्या माहितीनुसार संदीप शहा याला संपर्क साधला. त्यांनी घरी बोलावून सविस्तर माहिती दिली. एमबीबीएससाठी व्यवस्थापन कोट्यातून शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, याची खात्री दिली. यासाठी ६० लाखांची मागणी केली. चर्चेनुसार ही रक्कम ५० लाखांवर आणली. २९ जानेवारी २०१६ रोजी ही रक्कम शहा याच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आली.
यावर शहा यांनी आसिफ याच्या नावाचा बनावट ई-मेल तयार केला. वैयक्तिक पासवर्ड दिला. त्यामध्ये शहाने आपला स्वत:चा मोबाईल क्रमांक दिला. एमएच-सीईटीच्या ५ मे २०१६ रोजीच्या परीक्षेसाठी फॉर्म भरला. त्यात आसिफची जात मुस्लीम सर्वसाधारण प्रवर्गात असताना त्यात एस.टी. प्रवर्ग अशी नोंद केली. ती महाराष्टÑ शासनाच्या वेबसाईटवर नोंदवली. परीक्षेसाठी असलेला खोटा फॉर्म खरा असल्याचे भासवून तो आसिफ करून भरून घेतला.
प्रत्यक्षात आसिफचा एम. बी. बी. एस. प्रवेशासाठी नाव आले नाही. दुसºया वर्षी काम करू, असे सांगून आरोपी शहा यांनी वेळ मारून नेली. मात्र त्या वर्षीही नंबर लागला नाही. अनेक चकरा, फोनद्वारे संपर्क साधूनही हाती काही लागले नाही. मुलाचे २०१६-१७, २०१७-१८ हे शैक्षणिक वर्षे धोक्यात आले. टप्प्याटप्प्याने भरलेले ५० हजार रुपयेही गेले. आपली आर्थिक फसवणूक झाली, अशा आशयाची तक्रार पोलिसात नोंदली आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वाबळे करीत आहेत.
तीन मुलांना असे फसवले
- - अशाच प्रकारे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश देतो म्हणून आरोपी शहा याने यापूर्वी आणखी दोन मुलांना फसवले आहे. हा तिसरा गुन्हा पोलिसात नोंदला आहे. विजापूर नाका पोलिसांनी संदीप शहा यास अटक करून सोमवारी न्यायदंडाधिकारी मोरे यांच्या न्यायालयात उभे केले. त्यास पोलिसांनी तपासासाठी ताब्यात ठेवण्याच्या मागणीनुसार त्यास ७ डिसेंबरपर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावली.
मुलाच्या स्वप्नासाठी प्रॉपर्टी विकली
- - फिर्यादी राजेसाब कोटनाळ आणि त्यांच्या पत्नी रुक्साना हे दोघेही शिक्षक आहेत. दोन्ही मुले असल्याने मोठा आसिफ याचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. दोघांनीही शेती अािण बँकेचे कर्ज काढून रक्कम उभारली. मुलगा डॉक्टर झाल्यानंतर पुन्हा पैसे कमावता येतील हे बाळगलेले शिक्षक दाम्पत्याचे स्वप्न भंगले. आपली फसवणूक करणाºया आरोपीवर कारवाई करावी, अशी मागणी कोटनाळ यांनी फिर्यादीत केली आहे.