सोलापूर - वाराणसीच्या धर्तीवर पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरासोबतच संपूर्ण शहराचा विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात सोलापुरतील नियोजन भवनात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत अधिकारी व लोकप्रतिनिधी एकत्र येत विविध विषयावर चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर येथे श्री. क्षेत्र देहु, आळंदी, पंढरपुर, पालखी मार्ग, पालखी तळ विकास आराखाड्या अंतर्गत पंढरपूर व पालखी मार्गावर भाविकांना पायाभुत सुविधा देण्याच्या अनुषंगाने नव्याने समाविष्ट करावयाच्या कामांचा सुधारित आराखाडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित राहत घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, भुसंपादन व नातेपुते, माळशिरस, वेळापूर, अकलुज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी या पालखी तळावर पायाभुत सुविधा निर्माण करण्यासंदर्भात सुचना केल्या. यावेळी खा. जयसिद्धेश्वर स्वामी, आ.समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व पालख्यांचे विश्वस्त, वारकरी प्रमुख मंडळी, संबधित प्रांतअधिकारी, तहसिलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.