सोलापूर : गतवर्षी गाळपाला दिलेल्या बिलाची रक्कम मिळण्यासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकºयांनी २२ आॅक्टोबर रोजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांची भेट घेतली आहे.
सन २०१७-१८ च्या गळीत हंगामात लातूर जिल्ह्यातील शेतकºयांनी खेड येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज या कारखान्याला ऊस पुरवला आहे. राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही शेतकºयांना गतवर्षीच्या ऊसाची थकित रक्कम अद्याप मिळाली नाही़ कारखान्याने काही शेतकºयांना प्रति टन २२०० रुपये तर काही शेतकºयांना १८०० रुपये दिले आहेत. अंतिम बिलाची रक्कम अनेक शेतकºयांना अद्यापही मिळाली नाही.
लातूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांची नुकतीच भेट घेऊन शेतकºयांच्या व्यथा मांडल्या. ऊस बिलाची रक्कम गाळपाला ऊस दिल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचे बंधन असताना आठ महिने उलटून गेले तरीही कारखान्यांनी ही रक्कम जमा केली नाही.
विशेषत: सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा खेड येथील लोकमंगल माऊली साखर कारखाना रक्कम देण्यात पिछाडीवर असल्याची तक्रार जिल्हाध्यक्ष सस्तापुरे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांकडे केली आहे . कारखान्याने ही रक्कम दिली नाही तर २२ आॅक्टोबर रोजी लातूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापुरातील घरावर मोर्चा काढतील असा इशारा त्यांनी पत्रकातून दिला आहे.
या पत्रकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शंकरराव वरवटे, औसा तालुका अध्यक्ष अनंत दोडके - पाटील, मधुकर मोरे, दगडूसाहेब पडिले, मधुकर कदम, अमोल पवार, संदीप मुळे, मोहन कदम या ऊस उत्पादक शेतकºयांया स्वाक्षºया आहेत.