शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

सोलापूर महापालिका सभागृह नेतेपदाचा तिढा सुटेना, मुख्यमंत्र्यांनी बोलाविली उद्या मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:43 PM

झोन समिती सभापती निवडीचा प्रस्ताव परत जाणार म्हणून महापौर शोभा बनशेट्टी यांनी मंगळवार, दि. ९ जानेवारी रोजी बोलावलेल्या तहकूब सभेत सभागृह नेता कोण असेल, याबाबतचे  औत्सुक्य कायम राहिले आहे.

ठळक मुद्देप्रभारी सभागृह नेता निवडणे व गटबाजीचा विषय भाजपच्या वरीष्ठ पातळीवरमुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांसह महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, भाजप शहर अध्यक्षांना बुधवारी मुंबईला बैठकीला बोलावलेया बैठकीत सभागृहनेता व गटबाजीवर पडदा पडणार ?

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९  : झोन समिती सभापती निवडीचा प्रस्ताव परत जाणार म्हणून महापौर शोभा बनशेट्टी यांनी मंगळवार, दि. ९ जानेवारी रोजी बोलावलेल्या तहकूब सभेत सभागृह नेता कोण असेल, याबाबतचे  औत्सुक्य कायम राहिले आहे. हा तिढा सुटलेला नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दोन्ही मंत्र्यांसह सर्व पदाधिकाºयांना तातडीने मुंबईला बोलावले आहे. दोन गटातून कोणाची या पदावर निवड करायची हे या बैठकीत ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. सभागृहनेते सुरेश पाटील आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. त्यांच्या आजारपणामुळे डिसेंबरची सर्वसाधारण सभा तहकूब झाली. मागील अनेक सभा तहकूब असल्याने पेच निर्माण झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सभेत झोन समिती सभापती निवडण्याचा महत्त्वाचा विषय प्रलंबित आहे. पालकमंत्री व सहकारमंत्री गटातील गटबाजीमुळे हा विषय मागे पडला आहे. तीन महिने पूर्ण होत असल्याने हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत जाण्याची भीती असल्याने महापौर बनशेट्टी यांनी ९ जानेवारी रोजी तहकूब सभा बोलावली आहे. या सभेत सभागृहनेते म्हणून विषयाचे वाचन कोण करणार, याबाबत त्यांनी शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. वारंवार विचारणा केल्यावर सोमवारी सायंकाळी निंबर्गी यांनी प्रभारी सभागृहनेता कोण असेल, हे सभेच्या आधी कळविले जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे ही सभा होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू झाली. यादरम्यानच सायंकाळी पालकमंत्री गटाच्या ३५ सदस्यांची बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण स्याथी सबापती संजय कोळी यांनी अशी बैटक झाली नसल्याचे सांगितले. पण या गटातून अनेकांना सोमवारच्या सभेला हजर न राहण्याबाबत सूचना गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या सभेबाबत पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे.इकडे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी महापौर बनशेट्टी यांच्याबरोबर सभेबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात आले. भाजपमध्ये या सभेवर गटबाजी उफाळल्याचे लक्षात आल्यावर रात्री उशिरा कोठे यांनी एमआयएमचे तौफिक शेख, बसपाचे आनंद चंदनशीवे यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसचे चेतन नरोटे बाहेरगावी असल्याने मंगळवारी सकाळी ९ वा. पुन्हा बैठक घेऊन दिशा ठरविण्याचे निश्चित करण्यात आले. चर्चा करून आम्ही निश्चित चमत्कार दाखवू असे नरोटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. --------------------विरोधक एकत्र होणार- सभागृहनेतेपद शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पालकमंत्री गटाला सहकारमंत्री गटाच्या १६ सदस्यांचा विरोध मोडून काढायचा आहे.  कोठे समर्थक व पालकमंत्री गटाचे ३५ सदस्य एकत्र आल्यास कामकाज सुरळीत होईल असे म्हटले जात आहे. पण कोठे यांना घरातून विरोध झाला आहे. मंगळवारच्या सभेबाबत इतर विरोधकांशी त्यांचे बोलणे सुरू आहे.३५ नगरसेवकांनी सभात्याग केला तरी कोरम ठेवून सभा यशस्वी करण्याचा कोठेंचा प्रयत्न सुरू आहे.याबाबत वल्याळ यांनीही फिल्डिंग लावली आहे.-------------मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा निरोप- प्रभारी सभागृह नेता निवडणे व गटबाजीचा विषय भाजपच्या वरीष्ठ पातळीवर गेला आहे. त्यामुळे  मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांसह महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, भाजप शहर अध्यक्षांना बुधवारी मुंबईला बैठकीला बोलावले आहे. या बैठकीत सभागृहनेता व गटबाजीवर पडदा पडणार असल्याचे सूत्राने सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका