सरपंच, उपसरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील काठावर बहुमत मिळवलेल्या अनेक गावातील सदस्य सहलीवर गेले आहेत. फोडाफोडीच्या राजकारणामुळे प्रत्यक्ष सरपंच, उपसरपंच निवडीवेळी कोणत्या पॅनलचे सरपंच, उपसरपंच होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
९ फेब्रुवारी रोजी घाटणे, वडवळ, तेलंगवाडी, पोखरापूर, भोयरे, आष्टे, नरखेड, आढेगाव, पापरी, विरवडे बु, रामहिंगणी, शेटफळ, सिध्येवाडी, आष्टी, येवती, देवडी, चिखली, वडाचीवाडी, हिवरे, टाकळी सि, वरकुटे, कातेवाडी, शेजबाभुळगाव, सय्यद वरवडे, नजिकपिंपरी, कुरुल, सौंदणे, तांबोळे, पेनूर, खंडाळी, सावळेश्वर, खवणी, पाटकुल, शिरापूर मो, लांबोटी, अर्जुनसोंड, भांबेवाडी, विरवडे खुर्द, मुंढेवाडी, पोफळी, चिंचोलीकाटी, कोळेगाव, बिटले, गलंदवाडी/पासलेवाडी, अनगर/कोंबडवाडी, खंडोबाचीवाडी, नालबंदवाडी, कुरणवाडी (अनगर), वाळुज, मनगोळी/भैरववाडी, यल्लमवाडी, देगांव, मसलेचौधरी
१० फेब्रुवारी रोजी बोपले, एकुरके, वाघोली/वाघोलीवाडी, मिरी, वटवटे, घोडेश्वर, येणकी, कोथाळे, अंकोली, औंढी, कामती खुर्द, परमेश्वरपिंपरी, ढोकबाभुळगाव, शिरापूर सो, दादपूर, कोरवली, हराळवाडी, जामगाव बु, शिंगोली/तरटगांव, पिरटाकळी, नांदगांव, हिंगणी नि., इंचगांव या गावची सरपंच, उपसरपंच निवड होणार आहे.
दरम्यान निवडणूक अधिकारी राजशेखर लिंबारे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, महसूल सहाय्यक एल. एन. शेख, महेश कोटीवाले, योगेश अनंत कवळस, संजय गोटीवाले, मोईन डोणगावकर, मनोज पुराणिक हे अधिकारी परिश्रम घेत आहेत.
असा असेल सरपंच/ उपसरपंच निवडणूक कार्यक्रम
सकाळी १० ते १२ वेळेमध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करणे. दुपारी २ वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी त्यानंतर उमेदवारी मागे घेतल्यानंतर लगेचच सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक असणार आहे.