होटगी स्टेशन येथील जगन्नाथ गायकवाड यांच्या मातोश्री श्रीमती पार्वती शिवाजी गायकवाड यांचे गतवर्षी निधन झाले. त्यांचे प्रथम पुण्यस्मरण थाटात साजरे करण्याऐवजी वेगळ्या पद्धतीने करण्याचा संकल्प गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. गावातच असलेल्या वृद्ध विधवा महिलेने मोलमजुरी करून चार भिंती बांधल्या होत्या. त्यावर पत्रे टाकण्यासाठी पैसे नव्हते. याची माहिती जगन्नाथ यांना मिळाली.
आपल्या परोपकारी आईचे स्मरण एका वृद्ध आईला कायमचा निवारा करून देण्यासाठी त्यांनी १० नवीन पन्हाळी आणून त्या महिलेच्या घरावर घातले.
--------
२८होटगी-पत्रे
होटगी स्टेशन येथील जगन्नाथ गायकवाड यांनी वृद्ध विधवा महिलेच्या घरावर पत्र्यांचा निवारा करून आपल्या आईचे प्रथम श्राद्ध घातले.
----