युवकांच्या श्रमदानास सहकार्य करण्यासाठी समाजातील विविध दानशूर व्यक्ती व संस्था, संघटनांनी मदत करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही स्मशानभूमी आता केवळ स्मशानभूमी न राहता विरंगुळ्याचे एक ठिकाण बनू लागले आहे़ तुळजापूर रोडवर लिंगायत समाजासाठी आरक्षित असलेल्या काही जागांपैकी या भागातील लोकांच्या सोयीसाठी जागा दिली़ येथे दहनशेड बांधले; मात्र त्याची दुरवस्था झाली. या भागातील युवकांनी शिवजयंतीच्या दिवशी या स्मशानभूमीचा विकास करण्याचे ठरवले़ त्यानुसार या दहनशेड शेजारी असलेली घाण स्वत: स्वच्छ केली़ स्मशानभूमीतील काठ्यातून गेट तयार केले़ दानशुरांच्या मदतीने संरक्षक भिंत बांधली़ आता या स्मशानभूमीच्या परिसरात अंतिम विसावा कट्टा बांधून तयार आहे़ या परिसरात गुलाबाची बागही तयार केली आहे़ बोअर घेऊन सुमारे दोनशे झाडे लावली आहेत, तसेच अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी १६ बाकडे बसवले आहेत़ बाजार समिती गेट ते तुळजापूर रोड या परिसरात सुमारे १२०० झाडे लावून त्यांना ट्रीगार्ड बसवले आहेत़
दररोज सकाळी सहा ते आठ या वेळेत विविध भाव व भक्तीगीते स्पीकरवर लावून परिसरातील लोकांची सकाळ आनंददायी केली जाते़ कार्यकर्ते दररोज तीन तास श्रमदान करतात, तसेच तुळजापूर नाका ते रेल्वे पूलपर्यंतची रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता करून झाडे लावली आहेत़ त्यामुळे कावळे आणि चिमण्या जमू लागल्या आहेत.
४०जणांनी केला वाढदिवस साजरा
दुर्लक्षित असलेल्या स्मशानभूमीची स्वच्छता केल्याने आता वाढदिवस साजरे होऊ लागले आहेत. आतापर्यंत सुमारे ४० जणांनी वाढदिवस साजरे केले आहेत. शिवाय सध्या २० मुले व मुलींना लाठी-काठी व मर्दानी खेळाचे दररोज प्रशिक्षण दिले जाते.
यांचे मोलाचे योगदान
या स्मूशानभूमीचे रुपडे पालटण्यासाठी अध्यक्ष तुळशीदास मस्के, उपाध्यक्ष वसंतमामा हवालदार, सचिव राणाप्रताप देशमुख, सहसचिव ॲड. अनंत मस्के, खजिनदार पवन खरसडे तसेच संतोष मस्के, संतोष पवार, राजाभाऊ नवगण, आप्पा साळुंखे, किरण लुंगारे, नाना माकरड, किशोर आकोसकर, सौदागर मुळे, दीपक पाटील, मनोज बोकरे, बाळासाहेब जाधव, दादा लोहार, दीपक शिंंदे यांचे योगदान मोलाचे ठरत आहे.
फोटो
१२बार्शी-स्मशानभूमी
बार्शीतील दुर्लक्षित स्मशानभूमीत श्रमदान करताना जाणीव फाउंडेशनचे पदाधिकारी.