सांगोला : ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने बुधवारी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वतीने मानसिक आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात जिल्हास्तरावर डॉ.हर्षल थडसरे व त्यांच्या पथकामार्फत शिबिरातील रुग्णांची आरोग्य तपासणी, उपचार आणि समुपदेशन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घघाटन सहा. जिल्हाधिकारी तथा प्रशिक्षणार्थी अंकितकुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा दोडमणी, डॉ.पियुष साळुंखे-पाटील, डॉ. पूजा साळे, डॉ. बसवराज पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले यांनी शिबिरासंदर्भात माहिती सांगितली. याप्रसंगी रुग्णालयाचे डॉ. प्रफुल्ल चौधरी, डॉ. डोके, नडमने, निशिकांत पापरकर, समाधान शिवशरण, अरुण कोळी, आरोग्य सेविका रेश्मा वाघमारे, जयश्री जगदाळे, सुधा गायकवाड, अश्विनी काशीद, सहनाज खलिफा, श्याम वेन्डोले, केतन हिरेमठ तसेच स्वयंसेवक म्हणून अमोल येलपले, अमोल बनसोडे, अतुल म्हेत्रे उपस्थित होते.
---
फोटो : ०४ सांगोला हेल्थ
सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मानसिक आरोग्य तपासणी शिबीरप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. हर्षल थडसरे.